Viral Video : मेट्रोमध्ये तुफान राडा! दोन महिलांनी एकमेकींसोबत क्षुल्लक कारणावरून केलं ढिशूम-ढिशूम.
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2024/01/New-Project-2024-01-23T154321.95-780x470.jpg)
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2024/01/New-Project-2024-01-23T154321.95-780x470.jpg)
आपण पाहतो कि खूप वेळेस मेट्रोमधील व्हिडिओ समोर येत असतात किंवा व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडिया समोर येत आहे यात मेट्रोमधील प्रवाशांमध्ये सीट्सवरून भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. दिल्ली मेट्रोत दोन महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या दोन महिलांचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
दोन महिलांमध्ये एका सीटवरूनआधी किरकोळ वाद चालू असतात आणि नंतर वादाचे काही वेळाने चक्क हाणामारीत रुपांतर झाले. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिलांमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. यावेळी दोघी एकमेकींवर रागाने ओरडताना दिसत आहे अन अचानक एकमेकींमध्ये धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2022/07/PORTAL-PRATINIDHI-scaled.jpg)
यातील एक महिला सीटवर बसलेल्या महिलेला म्हणते कि, ‘मी कोण आहे माहितीय का ? आता तुला तिहार जेलमध्येच पाठवते’, अशी धमकी देत आहे. यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, दोघीही कोणाचंही ऐकण्यास तयार नव्हत्या. एक महिला दुसऱ्या महिलेला धक्का देते, यानंतर दोघींमध्ये हाणामारी होते.
पण, ही घटना कधी आणि कोणत्या मार्गावर घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन लाजिरवाणे असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे.