जागतिक दृष्टीदीनानिमित्त जि.प.शाळा गलवाडा(अ) नॅशनल स्कुल सोयगाव येथे विद्यार्थ्यांची करण्यात आली नेत्र तपासणी …..
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
दिनांक १३, गुरुवार रोजी जागतिक दृष्टीदिनाचे औचित्य साधून नॅशनल स्कूल सोयगाव येथे व जिल्हा परिषद प्रशाला गलवाडा येथे सुहासिनी जावळे नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची शालेय नेत्रतपासणी करण्यात आली.
तसेच उपस्थित मुलांना व त्यांच्या पालकांना नेत्रविषयक दृष्टिदोष ते टाळण्यासाठीच्या उपाययोजना व डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी व दृष्टीदिन याविषयी माहिती देण्यात आली याप्रसंगी नॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक .पठाण सर , जि. प.प्रा.गलवडाचे मुख्याध्यापक वंजारी सर , वर्गशिक्षक, माजी सरपंच सुरेखाबाई तायडे ,महिला तालुका अध्यक्ष ध्रुपदाबाई सोनवणे,
महिला आघाडीच्या अध्यक्ष पूनमताई तवळे,आशा सेविका संगीता पगारे ह्या सर्वांची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत बिस्कीट पॅकेटचे वाटप करत दृष्टीदिन साजरा करण्यात आला.