एसटी महामंडळाचा रिल्स स्टार लेडीज कंडक्टर मंगलगिरी यांच्या निलंबनावर घेतला ” हा ” निर्णय.
काही दिवसापूर्वी रील स्टार लेडीज कंडक्टर मंगलगिरी यांचे प्रकरण बरेच गाजले होते. सोशल मीडियावर रील्स बनवून त्या टाकत असत आणि हे बनवत असताना त्या कामावर असताना आणि कंडक्टरच्या ड्रेस मध्ये असताना बनवत होत्या आणि हा व्हिडिओ त्यांच्या वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर मंगल गिरी यांना वाहतूक नियंत्रक यांनी निलंबित केलं होतं.
त्यानंतर हे प्रकरण सर्वत्र चांगलेच गाजले होते आणि कळंब आगार येथील व्यवस्थापकांनी यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. आणि त्यामुळे अखेर त्यांची चौकशी करून एसटी महामंडळाने त्यांचाही निलंबन आता मागे घेतला आहे. यामध्ये आपण पाहिलं असेल की, अनेक राजकीय नेत्यांनीही या एसटी महामंडळाच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता.
कित्येकांनी आपापली वेगवेगळी मत मांडली यामध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवणे कुठल्याही कामकाजामध्ये अडथळा आणणार किंवा बदनामी करण्यासारखं नसल्यास ते एक वैयक्तिक मनोरंजनाचं काम आहे. पण तरी देखील महामंडळांनी बदनामी कारक कृत्य करत असल्याचा ठपका ठेवत १ ऑक्टोबर रोजी या कंडक्टर मंगलगिरी यांना निलंबित केलं होतं.
यामध्ये सर्वत्र विविध स्तरातून आक्षेप घेण्यात आला व तसेच कंडक्टर यांना सपोर्ट देखील केला. अखेर सगळीकडून वाढता दबाव पाहता महामंडळाने हे निलंबन मागे घेतलं आहे. यामध्ये मिळालेली माहिती अशी की महामंडळाने गुरुवारी आपल्या या निर्णयावर फेरविचार केला आणि यानंतर दोन ओळींचं पत्र लिहीत मंगलागिरी आणि कल्याण कुंभार यांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती दिली.
रील स्टार लेडीज कंडक्टर मंगलगिरी या रील बनवण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असून त्यांचे लाखो फॉलॉवर देखील आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकत असतात. त्यांच्या या रील्स ला भरपूर पसंतीही मिळत असल्याचे दिसत आहे मात्र हे सगळं महामंडळासाठी बदनामीकारक असल्याचे सांगत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं जे आता मागे घेण्यात आला आहे.