लव्ह मॅरेज’ केल्यानंतर दिराशी ठेवले अनैतिक संबंध, पतीने चार महिन्यांच्या बाळासह पत्नीला संपवलं.

बिहारमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि चार महिन्यांच्या मुलाची हत्या करून मृतदेह गंगा नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीचे आपल्याच भावाशी अनैतिक संबंध असल्याचं पतीचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच खून झाल्याचं सांगितलं जात आहे.मृत महिला तिचा पती जिवंत असताना तिच्या दिराच्या प्रेमात पडली होती, यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. पण सुरू असलेल्या प्रकाराला वैतागलेल्या पतीने अखेर पत्नीसह मुलाची हत्या केली.
पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी गेली होती, मात्र याचदरम्यान आरोपी पतीने मित्रासोबत तिच्या हत्येचा कट रचला. पतीने पत्नीला तिच्या माहेरून सासरच्या घरी आणलं आणि त्यानंतर रात्री पत्नी व मुलाला नशेचं इंजेक्शन दिलं. त्यामुळे पत्नी व मुलगा बेशुद्ध झाले. यानंतर रात्रीच पतीने दोघांनाही रुग्णवाहिकेतून मुंगेरला नेलं आणि मित्राच्या मदतीने पत्नी आणि चार महिन्यांच्या मुलाला गंगा नदीत फेकून दिलं. घरी परतल्यावर पत्नी पळून गेल्याचा बनाव रचला.
महिलेच्या वडिलांनी शेखपुरा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एसपींनी एक टीम तयार केली आहे. अनेक प्रकारे चौकशी केल्यानंतर पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. एसपींनी सांगितलं की, बोकारो येथील रहिवासी असलेल्या दिव्या कुमारीचे झारखंडमधील शेखपुरा येथील आशीष कुमारशी दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. प्रेमप्रकरणानंतर दोघांनी प्रेमविवाह केला होता.
लग्नानंतर दोघेही गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहत होते. मात्र, याच दरम्यान आशीषचा धाकटा भाऊ त्याच्या वहिनीच्या प्रेमात पडला. दोघांमधील वाढती जवळीक आशीषला आवडत नव्हती. या नात्याचा आशीषला त्रास होऊ लागला आणि त्याने पत्नी आणि भावातील वाढतं प्रेम आणि जवळीक संपवण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्याने मित्रासोबत पत्नीच्या हत्येचा कट रचला. पत्नीसह त्याने चार महिन्यांच्या मुलाला नशेचं इंजेक्शन दिलं आणि जिवंत गंगा नदीत फेकून दिलं. पण नंतर पोलीस तपासात संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी मारेकरी पती आणि रुग्णवाहिका चालकाला अटक करण्यात आली आहे.