१७ वर्षाचा मुलगा मोबाइल खेळत विहिरीजवळ गेला अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं…
मोबाईलचा अति वापर एखाद्याचा जीव घेऊ शकतो, कारण मोबाईलच वेड असण चांगल नाही एक अत्यंत वाईट घटना घडली आहे, एका शेतकरी कुटुंबातील मुलगा मोबाईल मुले मृत पावला, बाबासाहेब होगे यांचे मानवत तालुक्यातील नागर जवळा शिवारामध्ये शेत आहे. आज दुपारी ते आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक होगे हा त्यांच्यासोबत होता. अभिषेकचे वडील आणि नातेवाईक शेतामध्ये काम करत असताना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अभिषेकला विहिरीजवळ असलेली वस्तू आणण्यासाठी सांगण्यात आलं होतं.
मात्र मोबाइल पाहण्यामध्ये गुंग असलेला अभिषेक मोबाइल हातामध्ये घेऊन विहिरीकडे गेला. विहिरीला कटडे नसल्याने मोबाईलमध्ये गुंग असलेला अभिषेक विहिरीमध्ये पडला. विहिरीमधील लोखंडी रॉडवर अभिषेक आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेऊन जखमी झालेल्या अभिषेकला विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी मानवत येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर अभिषेकचा मृतदेह मानवत ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. शेतामध्ये काम करत असताना कुटुंबियांनी विहिरीजवळ असलेली वस्तू आणण्यासाठी पाठवल्यानंतर मोबाइलमध्ये गुंग असलेल्या १३ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
ही घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील नागर जवळा शिवारात घडली.दरम्यान, मानवत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयामध्ये धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे होगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.