एका आईसमोर २० वर्षाच्या युवकाने उचलले टोकाचे पाऊल, आई पाहूनही काहीच करू शकली नाही.

दिवसेंदिवस आत्महत्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे. २० वर्षाच्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरामध्ये हि सदरची घटना घडली आहे.
यामध्ये आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दिनेश नरेश लोमटे हे आहे. या ठिकाणी या आईचा काळीज ओढून टाकणारा आक्रोश व शोधण्यासाठी केलेली घालमेल, आरडाओरड ऐकून पत्रकारांनी धाव घेतली मात्र दिनेश हा मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या घडलेल्या धक्कादायक घटनेची नोंद अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे या ठिकाणी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून उडी घेत एका तरुण युवकाने त्याचे आयुष्य संपवले आहे यात त्याचा मृत्यू झाला आहे. पहाटे सकाळी दिनेश हा आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज परिसरातील परिसरात धावत सुटला. त्याच्या पाठीमागून त्याची आई त्याला थांबवण्यासाठी आरडाओरड करत धावत होती. हे सर्व पाहून मॉर्निंग साठी त्या परिसरात जाणारे पत्रकार यांनी दिनेशला थांबून त्याची समजूत घातली.
यानंतर समजूत घातल्यानंतर तो काही वेळ शांत झाला आणि हे शांत झालेले पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून पत्रकार निघून गेले मात्र काही वेळात दिनेशने वन विभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्यासमोर त्याने खोल दरीत उडी मारली. यानंतर आईने आरडाओरडा चालू केला या आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली. त्यावेळी दिनेश हा मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांना कळविण्यात आले या मागील कारण काय आहे याबाबतची माहिती आणखी समोर आलेली नसून पोलीस चौकशी करत आहेत.