धक्कादायक : एका बलात्काराच्या आरोपीने एका मुली सोबत असं काही केलं कि, संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाल.
गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज काही ना काही बातमी समोर येत असतात. एखाद्या सिनेमामध्ये घडावं अशी घटना या ठिकाणी घडली आहे. एका बलात्काराच्या आरोपीने एका मुली सोबत असं काही केलं की, ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसेल. सुरज नावाचा आरोपीने दोन वर्षांपूर्वी एका मुलीवर बलात्कार केला जेव्हा मुलगी तिच्या आई-वडिलांकडे गेली त्यावेळेस आरोपी सुरज याने तिच्या आईला वचन दिले की, मी तिच्याशी लग्न करीन पण दोन महिने उलटल्यानंतर तिने लग्नाला नकार दिला आणि तोपर्यंत ही मुलगी गर्भवती राहिली होती.
एवढं घडूनही मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगी परत आल्यावर आरोपी सुरजने पुन्हा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला पण यावेळेस मुलीने त्याला विरोध केला. आणि अशा वेळेस ” तुझ्या पत्नीला मी गरोदर केले आहे.” असे सांगून मुलीच्या पतीला त्याने भडकावले याचा राग येऊन या पतीने त्याच दिवशी त्याच्या पत्नीला कायमचे सोडून दिले. आणि काही महिन्यानंतर या मुलीने एका मुलीला जन्म दिला.
काही दिवसानंतर या आरोपी सुरजने या मुलीवर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर तरुणी एफ आय आर लिहायला गेली, तेव्हा सूरजच्या दबावाखाली शिवराजपुर पोलीस ठाण्यात एफ आय आर लिहिला गेला नाही असा आरोप लावला गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ८ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलीच्या वतीने शिवराजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी या आरोपी सुरजला अटक केलेले नसून मुलीची व सुरतची पहिली डी एन ए चाचणी झाल्याची स्पष्ट केले आहे.
या आरोपांमध्ये सुरज ला पोलीस पकडतील का नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.