टायर बदलण्यासाठी थांबलेल्या ट्रकला कारची धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वर तब्बल एवढा लोकांचा मृत्यू.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती अपघातांची मालिका सुरूच आहे. अगदी काही महिन्यापूर्वी एका राजकीय नेत्याचा देखील अपघाती मृत्यू झाला. पनवेल बोगदाजवळ सर्विस रोड टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या एका वाहनाला भरधाव वेगात येणाऱ्या एका इको कारन जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ईको कार मधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण यात जखमी झाले तर चार जण किरकोळ जखमी झाल्याची बातमी समोर येते.
या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ही स्थगित झाली होती. पहाटे दोनचा सुमारास अपघात झाला. सर्व जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला. लक्ष्मी कोंढाळकर गणेश कोंढाळकर असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र अध्याप जखमी असणाऱ्यांची माहिती काही समजू शकले नाहीये.
साताराहून नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी इको कार ने कोंढाळकर कुटुंब निघाला होता. या कारमध्ये 15 प्रवासी होते. इको कार ही महामार्गावरील सर्विस रोडवरील टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार पणे धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी सहा जण किरकोळ जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे.
या अपघाताची भीषणता लक्षात घेता खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ल पोलीस स्टेशनचे निरीक्षक सहाय्यक निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि जे जखमी आहे त्यांचे विचारपूस करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत. मात्र पुणे मुंबई या एक्सप्रेस वे वरती सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.