रिक्षावाल्याने दाखवला अश्या प्रकारचा प्रामाणिकपणा, पहा बातमी सविस्तर.
आजकालच्या काळात प्रामाणिकपणा पाहायला भेटणं अवघड आहे, पण हो आजही असे काही लोक आहेत जे आपल्या कामांमध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिक असतात. अशीच घटना कणकवली या ठिकाणी घडली आहे. रिक्षाने कणकवली येथून ओरोस येथे एका महिला प्रवासाची बॅग सोडताना रिक्षातच राहिली होती, पण रिक्षा चालक सिद्धार्थ हे याच्या लक्षात आले त्यांनी कणकवली येथील पोलिसांकडे ती सुपूर्द केली.
बॅगेत सापडलेल्या डॉक्युमेंट वरून पोलिसांनी सदरील महिलेशी संपर्क साधून त्या महिलेची बॅग तिच्याकडे सुपूर्द केली. यावेळेस या सिद्धार्थचे पोलिसांनीही प्रामाणिकपणाचे कौतुक केले. सिद्धार्थ हे जुन्या पोस्टाचं जवळ रिक्षाचा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान योगिता कांबळे राहणार ओरोस येथे जाण्यासाठी सिद्धार्थ यांच्याकडील रिक्षात बसल्या त्या त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या रिक्षातून उतरून रिक्षाचे भाडे दिले व निघून गेल्या.
पुढे कणकवलीत आल्यानंतर सिद्धार्थ यांना योगिता यांची बॅग रिक्षामध्ये राहिल्याचं लक्षात आलं आणि त्याच क्षणी पोलिस ठाणे गाठून पोलीस हवालदार देसाई यांच्याकडे बॅग देऊ केली. त्यांनी तपासणी केली असता बँकेत पैसे नसले तरी महत्त्वाची कागदपत्र होती. आणि त्या आधारे देसाई यांनी योगिता कांबळे यांना बोलावून सदरची बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली. सिद्धार्थ यांचा प्रामाणिक पणा पाहून योगिता यांनी त्यांना काही बक्षीस देण्याचा प्रयत्न केला मात्र सिद्धार्थ यांनी ते नम्रपणे नाकारले.