अबब ! माजी सरपंचावर 23 वर्षीय तरुणीने केला हनी ट्रॅप, व्हिडिओ डिलीट करायला मागितले “एवढे” लाख रुपये.
हनी ट्रॅपचे अनेक प्रकरण तुम्ही पाहिले असतील असे अनेक प्रकरण गाजलेले देखील आहेत. प्रत्येक शहरांमध्ये दिवसेंदिवस या घटना वाढत आहेत. यामध्ये बुलढाणा शहरात देखील क्राईम रेट वाढलेला आहे. शहरात एक हनी ट्रॅपची घटना घडली. हा हनी ट्रॅप एका माजी सरपंच सोबत घडला आहे . माजी सरपंचाला कॉल करून ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. माजी सरपंचांना व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, पैशाची मागणी करत होते.
एका महिलेने माजी सरपंचांना एका निर्जन स्थळी बोलावलं. मला तुमच्या सोबत संबंध प्रस्थापित करायचे आहेत असं तिने म्हटलं. त्यानंतर ती महिला सर्व कपडे काढून अश्लील कृत्य करणार तेवढ्यात तिथे दबा धरून बसलेले पाच जण आले, त्यांनी माजी सरपंचाला मारहाण केली, तसेच तुझे व्हिडिओ काढले आहेत ते व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देखील देण्यात आली. माजी सरपंच यांच्याकडे त्यांनी एक लाखाची मागणी केली. मात्र सरपंचांकडे एवढे पैसे नसल्यामुळे त्यांच्याकडे साडेपाच हजार रुपये घेऊन तेथून पळ काढला.
या सगळ्या प्रकारानंतर माजी सरपंचांनी थेट पोलीस ठाणे गाठले घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. सर्व आरोपींसह महिलेला पोलिसांनी अटक केली विविध कलमान अंतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आला. अशा घटना या बुलढाणा जिल्हात दिवसेंदिवस वाढतात. त्यामुळे अनेकांचे बळी जाऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचा अहवाल बुलढाणा पोलिसांनी केल, या प्रकरणात बुलढाणा पोलिसांनी काही तासातच पाच आरोपींसह 23 वर्षीय त्या महिलेला देखील अटक केली. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.