पोटच्या गोळ्याला पन्नास हजार रुपयांना विकले, पण पुढे त्या मुलीसोबत नको तसेच घडले ? पहा बातमी सविस्तर.
कोणते आई- वडील आपल्या लेकरा सोबत असं करणार नाहीत मात्र कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने आपल्या पोटच्या मुलीला पन्नास हजार रुपयाला विकली. असा धक्कादायक प्रकार समोर आला. जळगावातील भुसावळ शहरात हि घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, नाशिक मधील कुटुंबीयांनी आपली जेमतेम परिस्थिती असल्यामुळे 27 वर्षीय मुलीला भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील दाम्पत्याकडे 50 हजार रुपये मध्ये विकल आहे.
अमानुष छळ करून तिला बेदम मारहाण केली जात आहे. आपली घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ही मुलगी निमूटपणे सहन करत होती. सतत होणारा त्रास तिला असह्य झाला त्यामुळे त्याने पळ काढून पोलीस ठाणं गाठलं, सर्व कहाणी सांगितली त्यानंतर नरेश चव्हाण यांनी राधा अठवाणी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा होत असताना एकीकडे या पद्धतीने या मुलीचा छळ केला जात आहे.
तिला आई-वडिलांना भेटण्यासाठी देखील मनाई करण्यात आली होती, काही दिवसापूर्वी पीडित मुलीने अठवाणी यांच्याकडे आपल्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा वारंवार बोलून दाखवली, मात्र त्यांनी नकार दिला होता. स्वचछतागृह नीट साफ केले नाही म्हणून राधा अठवाणी यांनी तिला अमानुषपणे मारहाण केली होती. त्यामुळे पीडित मुलीने कशीबशी सुटका करून घरातून पळ काढला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे.
आठवाणी आणि कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पाहत आहे.