नगर : जिलेटीनच्या कांड्या लावून ATM उडवले तरीही चोरांना खाली हात जावे लागले, हे आहे कारण.
अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतीय बॉम्बस्फोट साठी जे साहित्य वापरले जातात ते साहित्य वापरून एक एटीएम ला उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात कुंदन हॉटेल च्या पाठीमागे घडली. या मध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. नगर तालुका पोलिस ठाण्यात या बद्दल गुन्हा देखील दाखल झाला आहे.
मनोहर काळे यांनी याबद्दलची फिर्याद दिली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे वाहनातून आले हॉटेलच्या शेजारी असलेल्या एटीएम मशीन गाळ्याचे कुलूप तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला. एटीएम मशीनच्या खाली जिलेटीनच्या काड्या लावल्या. स्फोट घडवुन एटीएम मशीन फोडलं दरम्यान एटीएम मध्ये रक्कम नसल्यानं चोरटे रिकाम्या हाताने परत गेले.
जिलेटिन च्या काड्या वापरून स्फोट घडवलामुळे परिसरामध्ये मोठा आवाज झाला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे त्यानंतर स्थानिकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलीस नव्हते का ? असा सवाल उपस्थित केला जातोय चोरी करण्याच्या नवनवीन युक्त्या चोर शोधून काढत आहेत. यामध्ये या चोरट्यांनी जिलेटिन च्या काड्या लावून एटीएम मशीन उडवून देण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना पैसे मिळाले नाही त्यामुळे खाली हात जावं लागलं. जिलेटिन च्या काड्या अशा पद्धतीने वापरणं हे खूप हानीकारक ठरू शकतं यावर ती पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.