नगर : शेंडी गावात दोन गटात राडा, मंदिरावर दगडफेक आणि घडलं बरंच काही ! पहा बातमी सविस्तर.

नगरमध्ये दोन गटांमध्ये राडा झालेली घटना घडली आहे. या घटनेमध्ये या गटाने चक्क मंदिरावर दगडफेक केली. संभाजीनगर महामार्गावर शेंडी गाव आहे या गावात दोन गटांमध्ये रस्त्यावरून वाद झाले. या वादाचे रूपांतर भांडणांमध्ये झाले तर यामध्ये एका गटाने चक्क मंदिरावर दगडफेक केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 17 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. तसेच पोलीस बंदोबस्ताचे आदेश देऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक आठरे यांना आरोपींचा शोध घेण्याचे सांगितले.
शेंडी या गावांमध्ये गणेश उत्सव मध्ये गौराईची पूजन होत असतात. हा उत्सव एकदम पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या गावांमध्ये काही ठिकाणी गटातटाचे राजकारण सुद्धा आहे त्याचप्रमाणे रस्त्याचा वादही आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदारपणे भांडण झाली आणि या भांडणाचे रूपांतर दगडफेकी मध्ये झालं.
या गावाजवळ असलेल्या लक्ष्मी माता मंदिरावर दगडफेक केली त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तत्काळ घटना ठिकाणी हजर झाले व रात्री उशिराने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 17 जणांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तत्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले आहे सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचे सांगितले आहे.