‘आदित्य साहेब, तुम आगे बढो’ चा एका चिमुरड्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

आदित्य ठाकरेंचा हा चिमुरड्या सोबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गणपती दर्शन करून येत असताना एका लहान मुलाने समोर येत आदित्य ठाकरे यांना नमस्कार केला त्यांच्या समोरच ‘आदित्य साहेब, तुम आगे बढो’ ची घोषणी दिली, यानंतर ठाकरे यांनी त्या छोट्या मुलाला सोबत घेत त्याच्यासोबत फोटो काढला. कुठल्या वर्गात शिकतोस असा प्रश्न देखील विचारल्याचे दिसत व्हिडीओत दिसत आहे.
तसेच थांब तुझ्या उंचीला येतो म्हणात खाली बसत ठाकरे यांनी चिमुरड्यासोबत फोटो देखील घेतला. दरम्यान “हे प्रेम गद्दारांना मिळणार नाही.. कारण प्रेम हे खोके देऊन मिळत नसते…” असे कॅप्शन देत एका ट्विटर वापरकर्त्यांने तीस सेकंदांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पडझडीनंतर आदित्य ठाकरेंनी राज्यभर दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. दरम्यान गणपती दर्शनाला गेलेल्या आदित्य ठाकरेंसमोर एका चिमुरड्या मुलाने “आदित्य साहेब तुम आगे बढो!” अशी घोषणा दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
तर नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना म्हणतात की गद्दारांना हे प्रेम मिळणार नाही कारण हे प्रेम खोके देऊन मिळत नाही हे निखळ प्रेम फक्त ठाकरे कुटुंबीय देऊ शकत. शिवसेनेला उभारी देण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे हे अपार कष्ट करत आहेत . त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.