बाजारसांवगी येथील आत्महत्याग्रस्त पत्रकाराच्या कुटुंबाला अर्थिक मदत करा.
विजय चौधरी- औरंगाबाद प्रतिनिधी
महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे खुलताबाद तहसीलदाराना निवेदन
बाजार सांवगी ता खुलताबाद येथील दैनिक भास्कर या वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असलेले मयत पत्रकार फिरोज पठाण बडे खान पठाण राहणार बाजार सावंगी यांनी त्यांच्या आर्थिक विवेचनाला कंटाळून दिनांक २५ ऑगस्ट रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती . त्यांच्या कुटुंबावर असलेले कर्ज माफ करण्यात यावे . व शासनातर्फे या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या वतीने खुलताबाद तहसिलदार सुरेंद्र देशमुख यांना देण्यात आले.
मयत पत्रकार फिरोज पठाण बडे खान पठाण राहणार बाजार सावंगी यांनी त्यांच्या आर्थिक विवेचनाला कंटाळून दिनांक २५ ऑगस्ट रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती .आत्महत्या करण्यामागचे कारण त्यांनी विविध बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते त्या माध्यमातून त्यांनी एक जनरल स्टोअर आणि सायकल मार्ट काढलेला होता सर्व काही व्यवस्थित चालू असताना करोणा या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आणि त्यांच्यावरती फार मोठे आर्थिक संकट कोसळले या संकटातून सावरताना त्यांनी अतोनात प्रयत्न केले परंतु ते त्यामधून बाहेर पडू शकले नाहीत.
त्यातच सतत बँक आणि पतपेढी यांच्यातर्फे होणारा तगादा यामुळे त्यांनी कंटाळून शेवटी आत्महत्या केली यामुळे त्यांच्या परिवारावरती फार मोठे आर्थिक संकट कोसळले अशा वेळी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे आपल्या पत्रकार बांधवांसाठी काही मदत होईल या दृष्टीने आज रोजी खुलताबाद येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की सदर पत्रकाराने ज्या आर्थिक विवंचने मधून आत्महत्या केली आहे.
अशा पत्रकारावर असलेले कर्ज शासन दरबारी पत्रव्यवहार करून माफ करावे व पत्रकाराच्या परिवारास काही आर्थिक मदत करावी कारण की मयत पत्रकाराच्या घरी सध्या कोणताही कमावता व्यक्ती नसून मयत पत्रकाराच्या मागे पत्नी आणि तीन मुले आहेत त्यांच्याकडूनही बँकेकडे असलेले कर्ज फेडणे शक्य होणार नाही यामुळे शासनाने पत्रकारासाठी काही योजनेच्या माध्यमातून त्यांच्यावर असलेले कर्ज माफ करून पत्रकाराच्या परिवाराला आर्थिक मदत करावी यासाठी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब काळे , कार्याध्यक्ष श्री सुनील वैद्य ,सचिव प्रकाश सातपुते ,उपाध्यक्ष सुधीर खैरे, राष्ट्रीय सरचिटणीस रमेश नेटके, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख योगेश शेळके, शेख निसार, हुसेन पठाण ,समीर शहा, जावेद शहा, भाऊसाहेब बनकर, वसंत शिरसाट , अजिंक्य काथार, राधेश्याम हिवाळे ,हुसेन पटेल ,रामलाल निंभोरे, सुधाकर जेठे , विजय चौधरी इत्यादी सह अनेक पत्रकार बांधव यावेळेस उपस्थित होते.