आंतरधर्मीय प्रेमविवाह प्रकरणाला वेगळं वळण, तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा संशय पहा बातमी सविस्तर.

अमरावतीची ही घटना आहे अमरावतीमध्ये आंतरधर्मीय प्रेम विवाह प्रकरणाला वेगळे वळण मिळाले प्रमाणपत्रावर दे काझी एवजी मजुराने सही केल्याचे उघड झाल्याने भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाह प्रकरण उघडकीस आणलं होतं. एका मुस्लीम तरुणाने हिंदू तरुणीशी बळजबरी विवाह केल्याचा आरोप त्यांनी केला होता. संबंधित प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील केली जात होती.
या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे, संबंधित विवाह बनावट कागदपत्रांच्या आधारे लावून दिलाचा पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील चंद्रविलास धर्मादाय संस्थेत लग्न लावून देण्याचा अधिकार नाही त्यांनी बनावट कागदपत्रे आधारे हा आंतरधर्मीय विवाह लावून दिला आहे. संबंधित लग्नाच्या कागदपत्रावर जी स्वाक्षरी होती ती स्वाक्षरी मुस्लिम काझी यांची नसून ती एका मजुराची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी चंद्रविला संस्थेविरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन हा विवाह लावून दिला आहे. तर गेल्या १० वर्षांपासून या चंद्रविला संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेक लव्ह जिहादसारखे प्रेम विवाह लावून दिले. अशा विवाहांसाठी चंद्रविला संस्थेला विदेशातून निधी मिळत असावा, असा आरोप भाजपा प्रवक्ते यांनी केला आहे. चंद्रविला संस्थेची सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
संबंधित प्रकरणावर भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदरील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “पहिल्या दिवसांपासून हे लग्नाचं प्रमाणपत्र खोटं आहे, यावर मेहरची रक्कम लिहिली नाही, यावर काझीची सही नाही, असं मी म्हणत होतो. पण स्थानिक पोलिसांनी संबंधित प्रकरण कौटुंबीक असल्याचं सांगून मुस्लीम युवकाला संरक्षण देण्याचं काम केलं, ही दुर्दैवाची बाब आहे.”
आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून चंद्रविला धर्मदाय संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी बोंडे यांनी यावेळी केली.