ती पाणी भरण्यासाठी उठली, रात्रीच्या वेळी परिसरात उजेड नव्हता आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं..
नळाचे पाणी सुटल्यामुळे पाण्याच्या मोटारीने पाणी भरत असताना पाण्याच्या मोटरचा शॉक लागून मुलीचा मृत्यू . गेल्या काही दिवसापासून विजेचा ये – जाचा खेळ चालू होता, त्यामुळे १२ दिवसाने पाणी आले आणि म्हणून पाणी भरायला मोटर लावली. आणि त्याचवेळी प्राजक्ता ( वय वर्ष १८ ) हि रात्रीच्या वेळी बाहेर आली आणि त्या मोटारीला स्पर्श झाला आणि तिला विजेचा जोराचा शॉक लागून त्याच ठिकाणी खाली पडली.
बाहेर अंधार असल्याने कोणालाच हि गोष्ट निदर्शनास नाही आली. आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. तात्काळ तिला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अश्या रात्रीच्या वेळी पाणी आल्याने एका १८ वर्ष्याच्या मुलीचा नाहक जीव गेला. आपल्याही घरात जर अश्या इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या व्यवस्थित चालतात कि नाही एकदा नक्की चेक करून पाहिले पाहिजे.