...
कोकण

इमारतीला लागली आग, बाल्कनीतून साडीच्या मदतीने मुलीने मारली उडी पण…LIVE VIDEO

गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटनेमुळे बचावकार्य करण्याबाबत नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. अशातच कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते, एका इमारतीला आग लागली होती. यावेळी आगीपासून वाचण्यासाठी चक्क साडीचा वापर करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे .

कल्याण पश्चिममध्ये खडकपाडा भागातील इमारतीला आग लागली होती.मोहन अल्टीजा असे इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती.

तिसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे फ्लॅटमधील रहिवाशांनी बाल्कनीतून दुसऱ्या फ्लॅटमध्ये साडीच्या मदतीने जाऊन आपला जीव वाचवला. बाल्कनीमध्ये साडीच्या मदतीने एक एक करून खाली उतरले. यामध्ये महिला आणि लहान मुलांना सुद्धा एकमेकांची मदत घेऊन खाली उतरवण्यात आलं. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

https://twitter.com/NewsMall18Live/status/1576893940262875138?s=20&t=v6Y3yuBEoX5h2nbFH4rSuQ

अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने दोन ते तीन फ्लॅट आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता .

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!