पत्नीसह तिच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार; भिस्तबाग महाल परिसरातील घटना

नगर – पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली असून या दोघांवरही एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावेडी उपनगर परिसरातील भिस्तबाग महाल परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे. जखमी पत्नी व तिच्या वडिलांचे प्रकृती अत्यवस्थ आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयात धाव घेतली जखमींच्या नातेवाईकांची त्यांनी चर्चा केली. दरम्यान, सदर आरोपी हा पोलीस खात्याशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे.

