शाळेच्या आवारात घुसला बिबट्या, त्यानंतर पहा शाळेतल्या मुलांसोबत काय केले ? पाहा बातमी सविस्तर.

सध्या कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल सांगता येत नाही. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील सबनीस शाळेच्या परिसरात बिबट्या ठाण मांडून बसला होता. मुलांच्या जीवाला धोका नको म्हणून शाळा प्रशासनाने मुलांना शाळेतून घरी पाठवले. या घटनेने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर एक बिबट्या आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भरवस्तीत बिबट्या आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. या घटनेबाबत वनविभाग आणि रस्क्यू टीमला माहिती देण्यात आली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सापळा रचून पकडण्यात आले.
आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा बिबट्या साधारण एक वर्ष वयाचा असल्याचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले. वारुळवाडी येथील भर वस्तीत असणाऱ्या रा. प. सबनीस विद्यामंदिर या शाळेत सुमारे साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. या शाळेत अगदी हाकेच्या अंतरावर शाळेजवळ बिबट्या लिंबाच्या झाडाखाली बसल्याचे आढळून आला.
आणि शालेय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ विद्यार्थ्यांना सोडून दिले. वनरक्षक व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सायं. ६ वाजता बिबट्याला रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जेरबंद केले. आणि या घटनेने बिबट्या आता मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणावर वावर करू लागला आहे तसेच मानवी जीव धोक्यात येण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. याबाबत उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे..