...
गुन्हेगारी

” दोघात तिसरा ” येताच झाले वाद, मिटवण्यासाठी हॉटेल मध्ये बोलवले आणि… पहा बातमी सविस्तर.

आजकाल सर्व ठिकाणी आणि सर्व स्थरावर अत्याचार गुन्हे हे घडत आहेत. राज्य कोणतेही असो गेन्हे अत्याचार हे चालूच आहेत, कधी नातेवाईक यांच्यामध्ये वाद तर कधी नवरा बायको, कधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मध्ये होणार वाद. कधी कधी हाच वाद टोकाची भूमिका घेतो आणि नको तेच घडते असेच काहीसे या सदरील बातमी मध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळेल. हि घटना उत्तर प्रदेश या ठिकाणची आहे.

तरुणीने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची कागदपत्रं सुशील कुमारकडे होती. दोघांमध्ये तिसरा आल्यावर नात्यात तणाव निर्माण झाला आणि तरुणीने सुशील कुमारकडे जमिनीची कागदपत्रं मागण्यास सुरुवात केली, दोघांमध्ये वाद टोकाला गेले. सुशीलनं प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. जमिनीचे कागजपत्रं नेण्यासाठी सुशीलनं प्रेयसीला १२ सप्टेंबरला केसरबाग येथील हॉटेलात बोलावलं. तिथे दोघांचं भांडण झालं. सुशीलनं तिथे तरुणीवर बलात्कार केला. आणि मग तिची हत्या केली. आणि हत्येनंतर हीच हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न त्यानं केला.

आरोपी रात्रभर हॉटेलमध्ये थांबला आणि सकाळ होताच हॉटेलमधून फरार झाला. हॉटेलच्या सर्व्हिस स्टाफनं सकाळी दार ठोठावलं. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्टाफला संशय आला. त्यानं मास्टर कीनं दार उघडलं. त्यावेळी बाथटबमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हॉटेल ९ इनमध्ये घडला या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह सापडला. या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा प्रियकर सुशील कुमार जयस्वाल आणि त्याचा मित्र राजेशला अटक केली आहे.

सुशील कुमारनं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशी माहिती लखनऊ पश्चिम विभागाचे डीसीपी शिवासिंपी चिनप्पा यांनी दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणीचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. अशी माहिती पोलिसांनी दिली.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!