नेवासा फाटा परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा 7 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका.
DySP संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई.
Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल पायल, हॉटेल नामगंगा, व हॉटेल तिरंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, Pi हर्षवर्धन गवळी, PI विजय करे, PI विलास पुजारी, Api मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.