शून्यातून विश्व निर्माण करणारे स्वीकृत नगरसेवक.

पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
मी रमेश हिरामण बिबवे.
मी मूळचा बिबवेवाडी चा भुमी पुत्र माझा जन्म बिबवेवाडी मध्ये झाला घरची परिस्थिती खूप चांगली होती. आमचे बापदादा म्हणजे बिबवे कुंटुब यांची शेती गुलटेकडी मार्केटयार्ड पासून अप्पर इंदिरानगर बिबवेवाडि इथ पर्यंत होती,काही बिबवे हे बिबवेवाडी गावत असे, व काही बिबवे बिबवेवाडी दरा म्हणजे मार्केटयार्ड रहाव्यास असायचे शेतात त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उदयास आली, त्यांना जागा हवी होती, त्यावेळी काही शेती रितसर मातीमोल भाव करुन घेण्यात आली काही जागा अरक्षित करण्यात आल्या राहती घरे वाडे तोडून हाकाल पट्टी करण्यात आली,
आमच्या वडीलांनी बैल टांगा घेवून हमाली चालू केली,आता शाळा बिबवेवाडी ती सातवी पर्यंत होती,प्रवेश झाला, बिबवेवाडीत जाताना दुपारी ही भिती वाटत असे नंतर मी आमचे चुलत्यांकडे म्हणजे शाळा जवळ पडते म्हणून बिबवेवाडी राहू लागलो, शाळेत फक्त पास न होता पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर घेतल्याशिवाय राहीलो,नाही शाळेजवळ घर म्हणजे आता सातवी नंतर संतनामदेव मग जवळ मार्केटयार्डचे घर काही दिवस बिबवेवाडी सोडल्यानंतर करमत नव्हते आता नवीन शाळा नवीन मित्र पण खर्चाचे काय तर शाळेचा पहिला दिवस कपड्याला ईस्री तर हवी मग ईस्रीला गेलो त्या काकांनी विचारले बेटा कपडे घरी देणेसाठी मुलगा मिळेल, का मी म्हणालो हो मिळेल की पगार किती देणार तू करणार असेल तर हप्प्त्याला पन्नास रुपये व रोज दहा रुपये असा पगार देणार,
शाळेत गेल्यावर विद्यार्थी परिचय झाला,तेथे शिक्षक बिबवेवाडी शाळेतील मग पुन्हा वर्गातील सेक्रटरीच मग दुसरे सकाळचे काम न्युज पेपर टाकणे २९० रुपये महीना मिळू लागला शिक्षण शिकता अभ्यास करता कामे पुढे चालूच होती पण घरची जबाबदारी माझ्यावर आली,काय झाले की काकांना अचानक गावी बोलावणे झाले, आणि काकांनी दुकान मला दिले,त्यावेळी ईस्रीला त्यावेळी १जोडी एक रुपया पासष्ट पैसे होते, मालक झालो, कामाला कामगार ठेवले,
मार्केटयार्ड भागात ते वेळी बरेच ग्राहक होते काम चांगले असलेने ग्राहक खुश होते, आता कमाई वाढीबरोबर आता रिक्षा लाईसन्स काढून चालवणे चालू केले, रिक्षा, ईस्री पैसे जमू लागले, माझा इस्त्रीचा व्यवसाय जोरात असल्यामुळे माझा जनसंपर्क खूप मोठा झाला जनसंपर्क मोठा असल्यामुळे मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली मला राजकारणाचा काही अनुभव नव्हता पण मी २००२ साल प्रचार करू लागलो
जिथे ईस्रीचे कपडे देतो,तेथे ओळखिच्या ठिकाणी जावू लागलो,त्याचवेळी मला प्रभागाचा उपाध्यक्ष म्हणून पद दिले,तसा माझे मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य चालूच होते, मग नागरिकांशी रोज संपर्क होऊ लागला या निवडणूका झाल्या सर्व जन निवडून आले,आताचे मा.सभागृह नेते श्रीनाथ भिमालेसाहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, यावेळी त्यांच्याबरोबर मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या पदवीधर च्या दोन निवडणूकीत खारिचा वाटा म्हणून काम करता आले,
तसेच पर्वती मतदार संघात प्रभागाच्या याद्या करता करता,मा.अध्यक्ष रघुनाथ आण्णा गौडा,सरचिटणीस मा.विश्वासजी ननावरे यांच्या मदतीने यांद्याचा अभ्यास करता आला ते वेळी मला आमदार यांनी पर्वती मतदार संघात चिटणीस, उपाध्यक्ष अनुक्रमे अशी पदे दिली मतदार संघात २ ते ३ नगरसेवक होते, आता २३ नगरसेवक आहेत, ते म्हणजे आपल्या भागाच्या दमदार आमदार मा.माधुरीताई मिसाळ ,बाबाशेठ मिसाळ यांच्याच मतदार संघात नंतर मी प्रभागाचा २ वेळा अध्यक्ष सरचिटणीस समन्वयक आणि पक्षाच्या वतीने स्विकृत नगरसेवक सदस्य पद मिळाले
पुणे महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली,हे पद लाभाचे नसून कामाचे असलेने कामे करुन घेतली. प्रभागांमध्ये कुठलेही इलेक्शन असो माझा सहभाग असायचा सर्व कामात पुढे आहे, पुढे पुणे महानगरपालिका विधानसभा, लोकसभा, पदवीधर अशा सर्वच निवडणूकीत सहभाग मग मोर्चे अंदोलन सर्वच चलो मुंबई, चलो नागपूर, असे अनेक मोर्चे आंदोलने केली,