मराठा समाजाच्या वादग्रस्त विधानानंतर, आज वयस्करांबाबत पहा सावंत काय म्हणाले बातमी सविस्तर.
उस्मानाबाद येथील हिंदुत्व गर्जना कार्यक्रमात मंत्री तानाजी सावंत यांनी एक धक्कादायक वक्तव्याला मराठा आरक्षणावरून विरोधक त्यांच्यावरती टीका करतात. सत्तांतरानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली का ? असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. यांना आरक्षण पाहिजे आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एसी मधून पाहिजे, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केला. सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाचे बडे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनीही स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांचे याबद्दल प्रतिक्रिया मिळू लागल्या….
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असतानाच शिंदे फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करता आहेत. हे एका मंत्र्याने बेजबाबदारपणे व्यक्त करणे अत्यंत लाजीरवान आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये उद्रेक निर्माण झालाय. तानाजी सावंत यांच हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारा आणि अपमान करणारा आहे. असे मत व्यक्त केल जात आहे..
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आणि गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यामध्ये अनेक जणांचे बळी देखील गेले आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये या वक्तव्यामुळे आता उद्रेक निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी बनलेल्या मंत्र्याने असे बेताल वक्तव्य करणे नक्की पुढे जाऊन त्याचे परिणाम यांना भोगावे लागणार आहे. अस बोलल्यामुळे सर्व मराठा समाज या मंत्र्याचा द्वेष करायला लागला आहे.
त्यानंतर त्यांनी मिडीया समोर सावरासावर देखील केलीली आहे. त्यात ते बोलताना म्हणाले कि, जे मराठा आरक्षण असणार आहे हे लवकर पारित व्हाव व हे जास्त काळ टिकाव यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि जर माझे बोलण्याने कोणाचे मन दुखले असेल तर मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे तसेच अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते माझ्या 90 वर्षाच्या म्हतार्यांपर्यंत जाहीरपणे माफी मागायला तयार आहे. कारण मी देखील एक मराठी समाजाचा आहे आणि एका शेतकरी कुटुंबातला आहे. त्यामुळे माझ्या माणसांची मला माफी मागायला कधी हि कमीपणा वाटणार नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.