कृषीमंत्र्याचाच मतदार संघ अतिवृष्टीच्या मदतनिधीपासून वंचित, सोयगावची वगळणी केल्याने शेतकरी निधीपासून वंचित.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी,
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जिल्ह्यात नुकसान याची रक्कम वाढीव दराने मिळणार असून दोन ऐवजी आता तीन हेक्टर ची मर्यादा करण्यात आली आहे त्यामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसानीची मदत मिळणार असून सोयगावला मात्र अतिवृष्टीच्या निकषातुन वळण्यात आल्याने एन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे
जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीत नुकसानेची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेले आहेत यासाठी यापूर्वीच्या प्रचलित दरापेक्षा वाढीव दराने मदत देण्यात येणार असून नुकसानीची हेक्टरी मर्यादित तीन हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वीच्या प्रचलित दरापेक्षा नुकसानीच्या भरपाईसाठी निकषा बाहेरील विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असून कोरडवाहू क्षेत्रासाठी 13600 बागायती क्षेत्रासाठी 27000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रु प्रमाणे हेक्टरी मदत 3 हेक्टर च्या मर्यादित मदत मिळणार आहे.
दरम्यान सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीचा अहवाल निरंक दिला असल्याने सोयगाव तालुक्यातील बाधित क्षेत्राच्या अहवाल शून्य टक्के पाठविला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्याची अतिवृष्टीच्या निकषांमधून वगळणी करण्यात आलेली आहे. तालुक्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची तीव्रता भयावह असताना मात्र प्रशासनाने पारदर्शक पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांची झोळी आणि दिवाळीत रिकामी राहणार आहे.
तीन वेळा अतिवृष्टी तरी भरपाई नाही.
सोयगाव तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन या पंचनाम्यामध्ये जून ते ऑक्टोबर हा कालावधी देण्यात आला परंतु तालुका प्रशासनाने दिलेल्या शून्य टक्के अहवालातून सोयगावची वगळणी करण्यात आली असून सोयगाव तालुक्यातील 34 हजार 587 बाधित शेतकऱ्यांच्या पदरात भोपळा मिळणार आहे.