विखेंच्या शक्ती प्रदर्शनात अजितदादा गैरहजर; ५० वर्षापासूनचा विखे – पवार वाद कि, निलेश लंकेवरचं प्रेम ??
नगर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार माजी खा सुजय विखे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे, सुजय विखे यांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीचे नेते मंडळी उपस्थित होते यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेद महायुतीतील काही नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते
प्रचंड मोठ्या संख्येने याठिकाणी गर्दी यावेळी समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली उन्हाचा एवढा तडाखा असतानाही समर्थक आलेले दिसले, दुसऱ्या ठिकाणी आपण पहिले तर आमदार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता करायला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगरमध्ये आले होते पण यांची उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभा उशिराने चालू केली ज्याने करून सभेला येणाऱ्या लोकांची हाल होणार नाही पण इकडे मात्र शक्ती प्रदर्शनासाठी लोकांचा विचार न करता सभा भरवण्यात आली
प्रतिस्पर्धी असणारे नगर दक्षिणचे महाविकास आघाडी उमेदवार आ निलेश लंके यांच्यावरती उपस्थित नेत्यांनी लंकेंवरती जोरदार टीका केल्या, महायुतीने आज सुजय विखे यांचा अर्ज भरला, शक्ती प्रदर्शन केले गेले आरोप प्रत्यारोप झाले सभेचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडियावरती व्हायरलही झाले मात्र यात एक चर्चा मात्र ती सतत होत राहिली ती म्हणजे एका नेत्याने मारलेली दांडी. आजच्या सभेनंतर हा चर्चेचा विषय बनला
महायुतीतील नव्याने गेलेल्या एका मोठ्या नेत्याने म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा ने या सभेला दांडी मारली आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया मात्र उंचावल्या गेल्या. सभेनंतर शहरातील कट्ट्यावर एकाच चर्चा चालू होती कि दादा का नाही आले ? काही जण म्हणाले कि निलेश लंके यांनी दादांची साथ सोडली तरी दादा लंकेंना मागून सहकार्य करत असतील, तर काही जण म्हणाले कि हा प्रि प्लॅन असू शकतो, तर जण म्हणाले कि पवार आणि विखे यांचा ५० वर्षापासूनच वाद आहे त्यामुळे आले नसावे. सुजय दादा यांचा अर्ज भरायला ते येणार होते पण त्यांनी दांडी मारल्यामुळे चर्चेचा विषय बनला त्याचं या सभेला न येन बरंच काही सांगून गेलं
ज्यावेळी निलेश लंके पारनेर मतदार संघातून उभे राहिले होते तेव्हा अजित दादा यांनी लंके यांना खूप मदत केली होती आणि असे देखील बोलले जाते कि निलेश लंके आणि अजितदादा यांचे खूप जवळचे संबंध आहेत म्हणून दादा आजच्या सभेला आले नसतील आणि कुठेतरी लंकेना छुपी मदत म्हणून अजित दादा उपस्थित राहिले नाही का असे अनेक तर्क वितर्क नेटकरी लावतायेत
जेव्हा लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली होती तेव्हाच अगदी एक वर्षांपूर्वी शरद पवारांसोबत लोकसभेचे कमिटमेंट होते आणि त्यामुळे निलेश लंकेनी शरद पवार गटामध्ये जाणे पसंत केलं तसं त्यांचा पक्षप्रवेश ही झाला आणि त्यावेळी अजितदादांना सोडताना कुठलेही टोकाची टीका किंवा कुठल्याही टोकाची उत्तरं न देता अजित दादांनी देखील लंकेंना न जाण्यासाठी आग्रह धरला होता मात्र निलेश लंके यांनी आपण शरद पवारांचे विचारांच्या आहोत म्हणून आपण त्यांच्याकडे जात आहोत हे स्पष्ट केलं होतं हे झाल्यानंतर कधीही निलेश लंकेने अजितदादांवरती कुठल्या टीका केल्या नाही आणि अजित दादांनी देखील लंके त्यांना सोडून गेल्यामुळे कधी टीका केल्या नाही एक समंजस अशी भूमिका या दोघांमध्ये नेहमी पाहायला मिळाली आणि बऱ्याचदा निलेश लंके यांना अजितदादा बद्दल काही विचारल्यानंतर निलेश लंके यांनी अजित दादा माझं वाईट करणार नाहीत असं स्टेटमेंट बऱ्याचदा दिलेले त्यामुळे अजित दादा खरंच लंके यांचं वाईट करणार नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय
यामागे काय कारण असतील हे फक्त आणि फक्त अजितदादा पवारच सांगू शकतील…..!!