अरेरे ! पोळ्याच्या सणासाठी बैलांना अंघोळीला नेले, अन त्याच बैलांनी काका पुतण्यासोबत पहा हे काय केले ?
सर्जा-राजाचा सण म्हणजेच बैलपोळा, महाराष्ट्रात बैल पोळा हा शेतकरी बांधव एखाद्या दिवाळीसारखा साजरा करतो. वर्षभर आपल पशुधन आपल्यासोबत काबाडकष्ट करत असतं म्हणून एक दिवस त्याच्या प्रती आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी असतो. तो दिवस असतो बैलपोळ्याचा, त्यामुळे सकाळपासूनच आपल्या पशुधनाला सजवण्याची त्याची तयारी करण्याची लगबग सुरू असते. अगदी आंघोळ घालणं, त्यानंतर त्याची सजावट करणं, त्याला गावभर वाजत गाजत मिरवण,पुरणपोळी खाऊ घालण अशीच लगबग फुलंब्री या ठिकाणी देखील सुरू होते.
फुलंब्री तालुक्यात बैल पोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. या ठिकाणी सनापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर काका आणि पुतणे केले होते. मदत यांच्यासोबत अत्यंत वाईट घडला. पंढरीनाथ काळे, रितेश काळे वय वर्ष ही त्या काका पुतण्यांची नाव आहेत. फुलंब्री तालुक्यातील जळगाव येथे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याचे पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली.
पंढरीनाथ हे बैल पोळ्याच्या सणानिमित्त आपल्या दोन्ही बैलांना धुण्यासाठी गावातील पाझर तलावात घेऊन गेले. त्यांच्या मदतीला रितेश नावाचा पुतण्या होता. तलावाच्या काठावर ते दोन्ही काका-पुतणे बैलांना धूत होते. दरम्यान त्यातील एका बैलांना त्यांना जोराचा धक्का दिला, जोरदार धक्का लागल्याने पंढरीनाथ त्यांच्या हातातील बैलाची दोरी सुटली आणि ते तलावात पडले. काका पडत असल्याचं पाहून पुतळा रितेशने त्यांना वाचवण्यासाठी उडी मारली, मात्र दोघेही पाण्यात बुडाले.
इतर शेतकऱ्यांकडून तिथे मदतीसाठी धावून गेले. मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं नाही दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने पोळ्याच्या सणाच्या पूर्वसंध्येला या गावात शोककळा पसरली आहे. ज्याचा सण होता त्याला धुण्यासाठी त्या ठिकाणी ते घेऊन गेले होते, मात्र ते पशुधन आहे चुकीने धक्का लागला आणि काका पाण्यात पडले काकाला वाचवण्यासाठी पुतण्याने आपला प्राण दिला. या दोघांनाही वाचविण्यात स्थानिक शेतकऱ्यांना यश आलं नाही आणि दुर्दैवाने ही घटना घडली.