अबब ! ” मुलींप्रमाणे ओढणी बांधून तो मुलींच्या वसतिगृहात गेला आणि त्यानंतर……” पहा सविस्तर.
अकोला येथील कृषी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिले असतील मात्र प्रत्यक्षात कधी तरीच असे प्रकार अनुभवायला मिळतात, चक्क एक मुलगा वेशांतर करून मुलींच्या वसतिगृहात शिरला. पण यावर कृषी विद्यापीठ प्रशासन काही कारवाई करत नाही दिसत नाही. कारण या घटनेला आठ दिवस उलटून गेले. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आंदोलन करण्यात आलं आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देखील देण्यात आले, विद्यार्थ्यांकडून प्रशासनानं अशा झोपेचं सोंग घेणाऱ्या धोरणावर ती तीव्र निषेध नोंदवला.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. नावाजलेल्या मोठ्या कृषी विद्यापीठातील वसतिगृहामध्ये एक मुलगा तोंडाला ओढणी बांधून जर मुलींच्या वसतिगृहामध्ये फिरत असेल तर त्या ठिकाणी मुली सुरक्षित आहेत का ? किंवा तो मुलगा त्या ठिकाणी गेल्यानंतर काही विपरीत करील का? यावर विचार करणं महत्त्वाचा आहे मात्र तसं होताना इथे दिसत नाही.
हा मुलगा मुली बांधतात तसं अगदी तोंडाला पक्क स्कार्प बांधून मुलींच्या वसतिगृहात शिरला याचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती viral झाला. त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी नाराज आहेत. कारवाई साठी आंदोलन करत आहेत त्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. हे प्रकरण इतका गंभीर आहे आणि यावर ती कारवाई केली पाहिजे. हा सगळा प्रकार पैंज लावण्याच्या गोष्टी वरून घडला आहे . एक मुलगा ओढणी बांधून मुलींच्या वसतिगृहामध्ये शिरला, यामुळे काही अनुचित प्रकार देखील घडू शकतो, ज्यामुळे वस्तीगृहाला या महाविद्यालयाला गालबोट लागू शकत आणि मुलींसोबत देखील चुकीचं काही घडू शकत.