जिल्ह्यात खळबळ माजवणारी घटना, ” या ” कारणांसाठी मृतदेहाची राखच जाते चोरी, पहा काय आहे कारण.

चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, यामध्ये अनेक गोष्टी चोरीला जातात आणि त्यानंतर काही न्यायालयीन यामध्ये दावे देखील दाखल होतात. मात्र अहमदनगरच्या एका गावाच्या स्मशानभूमीतून चक्क राखच चोरीला गेली, अशी खळबळजनक बातमी, पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावातून येत आहे. करंजी गावच्या स्मशानभूमीत सध्या एक विचित्र प्रकार घडत आहे.
रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीतून मृतदेहाची संपूर्ण राग अचानक गायब होते, त्यामुळे गावात खळबळ माजली. गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुजबूज सुरू होती, मृतदेहाची राख नेमकी कुठे गेली असा प्रश्न अनेकांना सतावत होता, अखेर त्याच्या मागचं कारण समोर आल. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशान भूमीतील राखेला चक्क पाय फुटले आहेत. अशा देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
अंत्यविधीनंतर उरणारी राख, अस्थी गायब होत असल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आतापर्यंत तीन ते चार वेळा असा प्रकार घडला आणि त्यामुळेच ही राख नेमकी कुठे जाते हा प्रश्न प्रत्येकाला उपस्थित होतो. गावातील लिलाबाई वामन यांचे दुःखद निधन झालं, करंजी गावातील उत्तरेश्वर मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले, दुसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांच्या अस्थीच गायब होत्या.
लिलाबाई यांच्या अंगावरती पावणेदोन तोळे सोनं होतं. त्यांना सोने घालण्याची हाऊस होती. त्यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या मुलांनी त्यांना नवीन नथ घातली होती, दाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही पण या घटनेमध्ये थेट राख अस्थीच चोरीला गेली म्हणून संताप व्यक्त केला जातो, डाग दागिने च्या आमिषापोटी हे घडत आहे असा अंदाज लावण्यात येत आहे . आतापर्यंत तीन ते चार वेळेस असे प्रकार घडले आहेत, पूर्वी कथा कादंबऱ्यांमध्ये सोन्याचा मणी मिळावा म्हणून राख चोरून ती चाळली जात असे अस सांगितलं जायचं ,मात्र करंजी गावात प्रत्येक साथ अशा गोष्टी घडत आहेत.