मा.खा.शरदचंद्रजी पवार यांनी पुण्यात महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा.
राष्ट्रीय नेते. मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुखांशी केली पुण्यात सविस्तर चर्चा. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने व मा.खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत सुमारे ६८ जनसंघटना व संस्थांच्या प्रतिनिधींनी आज सकारात्मक चर्चा केली.
महिला, बालहक्क, शिक्षण, आरोग्य अशा विविध सामाजिक विषयावर ज्या संस्था विधायक काम करत आहेत, त्या संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न व अपेक्षा या बैठकीत मांडल्या. रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करणाऱ्या संस्था आणि जनसंघटनांना बळ देण्याचा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला. संविधानाचा प्रचार व संविधानाचे भान असलेला माणूस तयार करणे हे फार महत्त्वाचे कार्य आहे.
यासाठी संविधान संविधान दिनी, २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सेंटर सुरू करण्यात येईल आणि जनसंघटनांना बळ देण्यासाठी व्यासपीठही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत आश्वस्त केले. तसेच आदिवासींचे व वंचितांचे प्रश्न व समस्या या संदर्भात एक स्वतंत्र सेंटर सुरू करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.
आज वरील चर्चेत चर्मकार विकास संघाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणुन सहभागी होतांना कष्टकरी गटई कामगार,महिला सक्षमीकरण,दिव्यांग यांच्या विषयी भुमिका सविस्तर मांङण्याची संधी मिळाली.या प्रसंगी मा.पवार साहेब यांना संघाटनेच्या कार्याचा अहवाल व समाजाच्या प्रश्नांचे निवेदन देवुन संत गुरु रविदास महाराज यांचे पेटींग भेट देण्यात आले. जिल्हाध्यक्ष मा.संतोष कानङे सहभागी होते. समाजसेविका मा.प्रतिभाताई शिंदे धन्यवाद.