गुन्हेगारी

शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून त्या नराधमाने ” तिच्या ” अंगावर पेट्रोल तर ओतले पण..

सध्या सगळीकडे गुन्हगारी वाढत आहे आणि अश्यातच वेगवेगळ्या बातम्या रोज आपल्या कानांवर पडत असतात अशीच एक बातमी बारामती मधून समोर येत आहे शरीरसंबंधाला नकार देणाऱया महिलेच्या अंगावर पेट्रोल अोतून तिला पेटवून देण्याचा प्रकार बारामतीत घडला.

या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निवृत्ती शेडगे रा. जळोची, बारामती याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १) रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी शेडगे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह विनयभंग व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

ही महिला येथे भाडोत्री घरामध्ये राहते. तिने एका पतसंस्थेकडून काही रक्कम काढून आणली होती. ती कपाटामध्ये ठेवत असताना शेडगे हा तेथे आला. त्याने हातात पेट्रोलची बाटली आणली होती. तु माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवणार का, अशी विचारणा त्याने केली. महिलेने त्याला तुझ्याशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत, तु घराबाहेर जा असे सांगितले. त्यावर चिडून जावून त्याने हातातील बाटलीतील पेट्रोल फिर्यादीच्या मागील बाजूने टाकले. काडी पेटीने काडी अोढत तिला पेटवून दिले.

या घटनेत महिलेच्या साडीने पेट घेतला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. त्याच स्थितीत ही महिला घरातून बाहेर अोरडत आली. शेजारील लोकांनी आग विझवत तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत ती जखमी झाली असून आगीमुळे घरातील साहित्यही जळाले.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!