दप्तर उघडताच बॅगेतून निघाला कोब्रा साप, शाळेतल्या मुलीसोबत पहा पुढे काय घडलं…
अनेकांना साप दिसताच घाम फुटतो. तर काही लोक तर वाट दिसेल तिथे पळू लागतात. अन् त्यामध्ये जर का किंग कोब्रा असेल तर मग विचारायलाच नको, कारण त्याच्या एका दंशानं देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण जर विचार करा हाच कोब्रा जर तुमच्या बॅगेत जाऊन बसला तर तुमची काय अवस्था होईल… ? होय, असाच काहीसा प्रकार एका शाळकरी मुलीसोबत घडला आहे. त्या मुलीच्या शाळेच्या दप्तरात चक्क एक साप होता.
लक्षवेधी बाब म्हणजे तिला याबाबत काहीच कल्पना नव्हती. अन् शाळेत पोहोचल्यावर जेव्हा तिने आपली बॅग उघडली तेव्हा तिला झटकाच बसला. त्यानंतर पुढे काय घडलं आपण पाहूया, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओ वर अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशी घटना जर तुमच्या सोबत घडली तर ?
सदरील घटना ही मध्यप्रदेशमधील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत घडली आहे. शाळेत येत असताना मुलीला तिच्या दप्तरात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवत होतं. पण मैत्रिणींसोबत गप्पा मारण्याच्या नादात तिने त्याकडे लक्ष दिले नाही. पण वर्गात पोहोचल्यावर जेव्हा तिने आपलं दप्तर उघडून पाहिलं, तेव्हा ते पाहताच तिला झटकाच बसला. क्षणाचा विलंब न करता तिने याबाबत आपल्या शिक्षकांना माहिती दिली.
त्यानंतर मग शिक्षक काळजीपूर्वकरित्या तिची बॅग घेऊन शाळेबाहेर गेले. त्या नंतर शिक्षकांनी दप्तरामधील पुस्तकं बाहेर काढली. व त्या सापाला जंगलात सोडून दिलं. या सापाला पाहून शिक्षकांना देखील झटकाच बसला. कारण तो चक्क जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा होता. @Karan4BJP या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शिक्षकांचं आणि त्या शाळेतल्या मुलीचं कौतुक केलं आहे. कारण त्यांनी साप पाहून गोंधळ घातला नाही. उलट शांतपणे त्याला बाहेर काढून जंगलात सोडलं.