ऑटोचालकाच्या मुलाची गगनभरारी, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक ! पहा बातमी सविस्तर..
आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अवतीभवती अशी परिस्थिती ही कधीही महत्त्वाची असते. महत्त्वाची असते ती आपली मेहनत आपली महत्वकांक्षा आणि आपण केलेला अभ्यास. बऱ्याचदा टोलेजंग महालात राहणारे मुलंदेखील कधीकधी अपयश होतात. कधी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या हे करतात. मात्र कधीकधी हातावर पोट असणारे अगदी झोपड्यात राहणारे मुलंदेखील गगनचुंबी अशी भरारी घेतात अशा अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील.
मात्र दिवसभर आपले वडील काबाड कष्ट करतात आणि नांदेड मध्ये रिक्षा चालवतात याच रिक्षाचालकाच्या मुलांना मात्र अशीच गगनभरारी घेतली या मुलाचं नाव जुनेद पठाण आहे याचे बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून त्यानं शिक्षण घेतलं, त्यानंतर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनीअरिंग केलं. आणि त्याला मुंबई येथे एका कंपनीत नोकरी मिळाली होती. नांदेड शहरातीलपीर बुर्हाण नगर इथला हमला इथे हा मुलगा रहिवासी आहे. त्याचे वडील जफर पठाण हे ऑटोरिक्षा चालक आहेत. त्यांना चार मुला आहेत ऑटो रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. रिक्षा चालूनच त्यांनी मुलांचं शिक्षण केला त्यांचा मुलगा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.
मुले लहान असताना त्यांच्या शिक्षणासाठी देखील जब्बार पठाण यांच्या कडे पैसे नव्हते. नातेवाईक, मित्रांची मदत, उसने पैसे घेऊन त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण केल. मुलगा पहिलाच प्रयत्न मध्ये यशस्वी झाला.मुलगा जुनेद मुंबई शहरामध्ये नोकरी करत होता. अगदी बिकट परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेऊन नोकरीला लागला होता. पण जुनेदने आपली नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली आणि पहिल्याच पहिल्याच प्रयत्नात सातत्य चार वर्षे अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत जुनेद यशस्वी झाला. तेव्हा पाच रुपये, दहा रुपये जमा करून आपण राहतो त्या आठवणींनी गहिवरून जातो. फक्त अभ्यासाच्या जोरावरच आपण यशस्वी झालो असं तो सांगतो. आज नांदेड शहरात जुनेदच आणि त्याचे वडील आज सर्वत्र तोंड भरून कौतुक केले जात आहे.मन लावून अभ्यास केला, तर परिस्थिती काहीही असली तरी आपण यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जुनेद पठाण होय .