बाप रे ! आता या पासून बनवले जाणार आहे पनीर.
आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर बरेच जणांची पहिली पसंद ही पनीर पासून बनवलेल्या पदार्थांची असते. आपल्या भारत देशामध्ये पनीर पदार्थांचे शौकीन भरपूर आहेत. देशातल्या बहुतेकांच्या जीवनातला पनीर हा आवडता घटकच बनला आहे. सर्वसामान्य लोकांना पनीर खूप प्रमाणात आवडतो. सहसा आपण हॉटेलमध्ये जे पनीर खातो ते गाईच्या अथवा म्हशीच्या दुधापासून बनवले जाते मध्यंतरी बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या दुधापासून बनवलेले पनीर देखील उपलब्ध झालेले माहित असेलच.
पण या सगळ्या पनीरची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. पण आता एका पनीरची किंमत ऐकून तुम्ही अवाक आणि त्यातल्या त्यात हे पनीर कशापासून बनवले जाणार हे जर ऐकले तर आश्चर्याचा धक्का नको ! आता हे जे पनीर बनवलं जाणार आहे हे जगातल्या सगळ्यात महागड्या पनीर पेक्षाही महाग असणार आहे. सगळ्यात महागडा पनीर बनवलं जाणार आहे ते म्हणजे चक्क गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं पनीर असणार आहे अशी माहिती दिली आहे. हे पनीर म्हणजे आपल्यासाठी लक्झरी पनीर असणार आहे आणि या पनीरची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील.
या गाढविणीच्या दुधापासून बनवलेले जे पनीर असणार आहे. त्याची किंमत आहे तब्बल 800 ते 1000 युरो म्हणजे आपल्या भारतीय चलनामध्ये जर सांगायचं झालं तर 82 हजार रुपयापेक्षा थोडं जास्तच प्रतिकिलो ला आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. हे पनीर जगातल्या सर्वात महागड्या पनीर पैकी एक पण असणार आहे. हे पनीर बनवला जाणार आहे ते गाढविणीच्या दुधापासून हे पनीर थोडसं कुरकुरीत व पांढरे शुभ्र असतं. हे पनीर स्पॅनिश पण दिसतं. या पनीरची चव तर चीज पेक्षाही वेगळी असते. मॅचिंग ब्रिटिश सुपर मार्केटमध्ये अगदी स्वस्थ 12४5 रुपये मध्ये मिळतं. डोंकी पनीरला पुले पनीर म्हणूनही ओळखलं जातं.
जर तुम्ही पनीर पदार्थांची शोकीन असाल किंवा तुम्हालाही हे पनीर खाण्याची इच्छा असेल तर, हे महागडे नक्की खाऊन बघा. फक्त त्यासाठी हजार रुपये मोजायची तयारी मात्र ठेवावी लागेल. कारण हे पनीर बनवलं जाणार आहे गाढवणीच्या दुधापासून.