व्यवसाय

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण.

तीन मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात चालू आहे

जामखेड तालुका प्रतिनिधी,
चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी आगामी हिंदी चित्रपट ‘लोरी’चे गीत लेखन केले असून, सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आकरा करोड पन्नास लाख पंचेचाळीस हजार सातशे रुपये एवढा गल्ला करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले. सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.

अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्डचप्र स्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!