दगडवाडीतील दलित समाजाच्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय समोर घंटानाद आंदोलन.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख.
पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील उमाप कुटुंबे गेली 70 वर्षापासुन रहिवासी आहेत त्यांना शेतीवाडी नाही, मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात, यांना आजपर्यंत शासकीय कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, या विषयासंदर्भात दलित महासंघ या संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे
पाथर्डी तालुका पैकी मौजे दगडवाडी तसेच महाराष्ट्रात शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी 1,35,000 नागरीकांची नोंदणी केली, त्यापैकी शासनाने 66,000 लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे असे असताना पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी गावातील दलित समाजास गेल्या 70 वर्षीपासून रहिवासी असून देखील, विविध योजनांपासून वंचित ठेवण्याचे काम याठिकाणी गाव प्रशासनाकडून आजही होतांना निदर्शनास आल्याने दगडवाडी येथील दलित समाजाच्या विविध मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
यांच्या मागण्या पुढिलप्रमाणे ,
1 दगडवाडी येथील मातंग समाजास शासकीय आवास योजनेसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन नोंदिचे उतारे देण्यात यावे. 2 येथिल भुमिहीन मातंग समाजास शासनस्तरावरील पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत त्वरित प्रस्ताव करून घरकुल लाभ देण्यात यावे, 3 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक सुलभ शौचालयाचे प्रस्ताव घेऊन वैयक्तिक शौचालय लाभ देण्यात यावा, 4 दगडवाडी येथील मातंग दलित वस्तीस डॉ, बाबासाहेब आंबेडकर नगर नावं देण्यात येउन स्वतंत्र दलित वस्ती घोषित करण्यात यावी.
5 मातंग वस्तिमध्ये सुरू असलेल्या शोष खड्यांचे मलनिस्सारण काम त्वरीत बंद करून ते दुसरीकडे करण्याचें आदेश द्यावेत, 6 मातंग वस्तिमध्ये समाज मंदिर, पथदिवे, सिमेंट रस्ता,व इतर मुलभूत सुविधा देण्यात यावा, मातंग वस्तिमध्ये रहात्या घराच्या दारात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयामुळे वस्तिमधिल वाढत्या रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदरचे शौचालय दुसरीकडे हलवण्यात यावे, तरी हे निवेदन, दिले व समाजकल्याण अधिकारी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, पाथर्डी तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी पाथर्डी, पोलिस निरीक्षक कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर, असे देण्यात आले आहे, तरी वरील मागण्या संदर्भान्वये करतं असलेल्या आंदोलन प्रसंगी उद्भवणार्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी असाही इशारा देण्यात आला आहे,