कॉलेज संपवून घरी जात होत्या दोघी, तेव्हाच वाटेत…
रस्त्यावरती चालताना देखील महिला सुरक्षित नाहीत याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे कारण रस्त्यावरून त्या दोघी जात असताना त्या दोघींवरती अज्ञात आणि कृष्ण हत्यारांना हल्ले केले होते,कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर येते कॉलेज आटवून त्या दोघीजणी निघाल्या होत्या वाटे त्यांच्यावरती एका धारदार तीष्ण हत्यारांना हल्ला झाला हा हल्ला कोणी केला याबद्दलची कुठलीही माहिती मिळाली नाही अज्ञाताच्या या हल्ल्यामुळे या दोघे देखील गंभीर जखमी झाल्या या दोघींना उपचारासाठी दाखल करण्यात आला,
मात्र या घटनेमुळे मुलींची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे, रस्त्याने चालताना देखील मुली सुरक्षित नाहीत हे देखील अधोरेखित झाले या मुलींसोबत हा प्रकार का घडला याचा छडा पोलीस लावतात मात्र ही घटना काय घडली यावरती नजर ,रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. भालावलीमधल्या दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. भालावलीमधल्या दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणारी ही व्यक्ती अज्ञात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन्ही मुली नजीकच्या महाविद्यालयातून घरी जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.सिद्धी संजय गुरव आणि साक्षी मुकुंद गुरव अशी या दोन मुलींची नावं आहे. या दोन्ही मुलींचं वय 22 वर्ष एवढं आहे. या दोन्ही मुली भालवली वरची गुरव वाडी इथल्या रहिवासी आहेत. या हल्ल्यामध्ये दोन्ही मुली जखमी झाल्या असून एकीची प्रकृती गंभीर आहे
सिद्धी आणि साक्षी या दोन्ही मुली भालावली सिनियर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. या प्रकरणी नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी मुलींना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे. मुलींवर हा हल्ला कुणी केला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या मुलींवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून हल्लेखोर फरार झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी विनायक शंकर गुरव यांना ताब्यात घेतलं आहे. जमिनीच्या वादातून या मुलींवर हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.