हलाखीच्या परिस्थितीवर मात करत भावना केदार बनल्या एक यशस्वी महिला व्यावसायिक, पहा त्यांचा जीवनप्रवास.
स्त्रीला घर संसार सांभाळून आपली स्वप्न पूर्ण करणं हे मोठं आव्हान असतं मात्र जिथे चिकाटी असल्यानंतर ती आपल्या मुलं बाळ, आपला संसार, आपले कर्तव्य सांभाळत आपल्या स्वप्नही पूर्ण करू शकते. भावना केदार यांना ही आयुष्यात अशा अनेक आव्हानांना सामना द्यावा लागला, स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षणाला संघर्ष करावा लागला
मात्र कधीही न डगमगता त्या संघर्षात खंबीरपणे उभा राहिल्या. तीन मुलांचा सांभाळ करत त्यांची सर्व जबाबदारी पार पाडत त्यांनी आपली ही स्वप्न पूर्ण केली. कोरोनाच्या संघर्षा काळात त्यांच्या पतीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झालं आणि त्यांच्यावरती कुटुंबाचे सर्व जबाबदारी आली, दोन मुली, एक मुलगा यांचे शिक्षण त्यांचे लग्न या सगळ्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले, मात्र त्या डगमगला नाही, हसत हसत सर्व आव्हानांचा सामना केला.
कशी झाली संघर्षाची सुरुवात.
१९९२ला त्यांचे लग्न दत्तात्रय केदार यांच्या सोबत झालं .भावना ह्या खूप सारे स्वप्न घेऊन आपल्या पतीच्या घरी आल्या, भावना यांचं १० पर्यंत शिक्षण झालेलं, नवरा मुलाच्या घरी चांगलं आहे, म्हणून त्यांचं लवकर लग्न लावण्यात आल, मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला कारण खरी परिस्थिती थोडी वेगळी होती, नवऱ्याला ७०० रुपये पगार होता, तुटपुंज्या पगारात आपले कोणते स्वप्न पूर्ण होणार नाहीत याने त्यांना आघात झाला, 2,3 महिने त्या आजारी होत्या. मात्र आईने समजूत काढली तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुलाच स्वतच्या पायावर उभा राहव लागेल.
त्यानंतर त्यांनी निश्चय केला आपल्या संसारात आपल्याला दुसरं चाक व्हायचं,त्यामुळे त्यांनी घरगुती काही ना काही काम करण्याला सुरुवात केली त्यातून चार पैसे मिळाले की त्याला आपल्या संसारात वापरत, यात त्यांना पहिली मुलगी झाली खर्च वाढला मात्र कष्ट करायचे अस ठरवल्या मुळे त्यांनी २००० झाली ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि आपल्या व्यवसायाला हळू हळू सुरुवात केली .त्या फक्त एवढ्यावर थांबल्या नाही तर त्यांनी सौंदर्याचे अनेक पॅक तयार केले , तेल तयार केले,घरगुती मेहंदी बनवणे ते विकले. घरोघरी ,गावोगावी जाऊन त्यातून त्यांच्या कामाची प्रसिध्दी होत गेली तस पार्लर नावारूपाला येऊ लागेल.
डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग असे अनेक काम त्या करत होत्या .त्यावेळी एका महिलेने कामासाठी बाहेर फिरणे वैगरे खूप चुकीचं समजत अनेक वेळा नाव ही ठेवत मात्र त्या मागे हटल्या नाही. वेगवेगळ्या स्पर्धा भाग घेणं बक्षीस मिळवणं यात ही त्यांना रस असे.
अनेक छोटे मोठे जोड व्यवसाय करून त्यांनी पैसे उभे केले आणि प्रशस्त, आत्यधूनिक अस स्वतः च मोठं पार्लर सुरू केलं.त्याला नाव प्रिझम acdamy अस दिल. मात्र आयुष्यातला संघर्ष संपला नव्हता. एके दिवशी अचानक कळलं की आपल्याला पतीला कॅन्सर झाला आहे त्यांची ट्रीटमेंट सुरू केली .अनेक दिवस त्यांचे उपचार सुरू होते मात्र पतीने ही साथ सोडली , कोरोनाच्या महा भयानक काळात पतीचे निधन झाल . आता घराची सर्व जबाबदारी ही भावना यांच्यावरच आली, तीन मुलांसाठी आता आई वडील दोन्ही त्याच होते .तसेच घराचे हफ्ते , उपाचरसाठी घेतलेलं कर्ज, मुलाचे शिक्षण , पार्लरचा व्यवसाय,असे अनेक आव्हानं उभे थाटले .मात्र खाचून न जाता गंभीर पने उभ्या राहिल्या ,मेहनत सुरू ठेवले.
आज त्या आपल्या पार्लर व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. स्किन च्या सर्व ट्रिस्टमेंट, हेयर , मुलींचा ट्रेनिंग हे सगळं त्या आज स्वतः च करतात.आपल्याला कडे येणार कस्टमर आपल्यासाठी येतात त्यांची सेवा मी माझ्या हाताने करणार अस त्या आवर्जून सांगतात.
आपल्या आयुष्यात हसत हसत सर्व संकटांचा सामना करत यशस्वी ठरलेल्या भावना केदार त्यांच्या प्रिझम अकॅडमीला एकवेळ अवश्य भेट द्या. पत्ता: प्रोफेसर चौक, मॉन्जीनिअस शॉप जवळ, अहमदनगर. संपर्क : ८४५९२३६००७.