दसरा मेळाव्याची ही अत्यंत जुनी परंपरा आहे या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनीही परंपरा घालून दिलेली आहे. मात्र यंदाच्या वर्षी दसरा मेळावा नेमकं कोण घेणार हा मोठा वाद निर्माण झाला होता. कारण काही काळापूर्वी शिवसेनेमध्ये गटबाजी झालेली आहे. शिवसेनेतून एक गट बाहेर पडला आहे. त्याला शिंदे गट असे म्हणतात तर शिंदे गटाने देखील दसरा मेळावा करण्यासाठी दावा केला होता.
त्यासाठी त्यांनी पूर्णपणे तयारी केली होती आणि न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती, संपूर्ण महाराष्ट्रात दसरा मेळावा कोण घेणार ? कोणाचा असणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. शिवसैनिकांमध्ये देखील त्याबद्दलचा मोठा संभ्रम होता. कारण शिवसेनेतील ठाकरे गटातील ही शिवसैनिक आहेत आणि शिंदे गटातील देखील शिवसैनिकच आहेत त्यामुळे शिवसैनिकांची दसरा मेळाव्याबद्दलची आत्मीयता ही जरा वेगळीच असते.
त्याबद्दल दशहरा मेळावा नेमका कोणाचा हा प्रश्न उपस्थित राहिला होता मात्र आताच्या मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता दसरा मेळावा नेमका कोणाचा होईल ? शिवाजी पार्क वरती हा दसरा मेळावा कोण भरवेल आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कोण शिवगर्जना करेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.