अखेर आई आणि त्या छोट्या बछड्याची भेट झालीच, पहा काय आहे प्रकरण सविस्तर.
बाळ जर लांब गेलं तर ती आई कासावीस होते. याच्यामध्ये आईचं आणि बाळाचे जे नातं आहे ते सर्वश्रुत आहे .प्राण्यांमध्ये सुद्धा आई आपल्या बाळाचं संरक्षण करत असते. अनेक प्राणी तुमच्या माद्या आहेत त्या आपल्या बाळाला आपल्या सोबतच ठेवतात. एकदा त्यांना उडायला पंख फुटले ते स्वावलंबी झाले की, त्यांना कुठेही वावरू देतात.
ही गोष्ट सज्जनगड परिसरातील आहे या परिसरात एक बिबट्या खेळताना आढळून आला. हा बछडा होता आणि लहान असल्यामुळे उपस्थित सर्वजण त्याच्यासोबत सेल्फी काढत होते, मात्र त्यांना हा सेल्फी काढणं महागात देखील पडू शकत कारण अचानक मादी बिबट्या त्या ठिकाणी आला तर तो त्या नागरिकांवरती हल्ला देखीलकरू शकत होता.
बछड्याला त्याच्या आईकडे सोडवण्यासाठी वन विभागाने सापळा रचला. रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याला आपल्या आईकडे पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्या बछड्याला एका खुराड्यांमध्ये ठेवलं आणि त्या ठिकाणी मादी बिबट्या येऊन पोहोचली आणि त्या बछड्याला ते जिभेने चाटू लागली अलगद त्याच्या मानेला धरलं आणि ती जंगलामध्ये घेऊन जाऊ लागली वनविभागाच्या कर्मचारी यांनी एका आईला आणि बछडाला मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचे सर्वत्र कौतुक केले जाते.
काही दिवसांपूर्वी या परिसरातून शेळ्या जनावर वासरं हे गायब होण्याचे प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे या ठिकाणी बिबट्या असू शकतो असा अंदाज बांधला जात होता आणि बछडा आढळल्यानंतर या ठिकाणी बिबट्या आहे हा अंदाज खरा ठरला, मात्र हा लहान बछडा आपल्या आईपासून दुरावलेला होता. त्यामुळे या आईचा आणि बछड्याचे मिलन होण्यासाठी गावकऱ्यांसह वन विभागाने विशेष प्रयत्न केले आणि या दोघांचा मिलन घडवून आणला. बिबट्या आणि बछडा यांच्या दोन भेटींचा विषय या भागात चर्चेचा विषय ठरला आहे.