मोठी बातमी : नितेश राणेची पोलिस अधिकाऱ्यांना धमकी, ” हिंदू मुलांकडे वाईट नजरेन पाहाल तर तुमचे…”
भाजपाचे आमदार यांचं नगरमध्ये येणं जाणं वाढलेलं दिसतंय. मूळचे कोकणातला असणारे आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर दौऱ्यावर असताना दीपक बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. भोकर येथील आदिवासी समाजातील युवक दीपक बर्डे याने मुस्लिम युवती सोबत लग्न केलं होतं. आणि त्यानंतर तो युवक गेल्या नऊ दिवसापासून बेपत्ता आहे त्याचा अजूनही शोध लागत नाही. त्यामुळे सर्व स्तरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यादरम्यान आमदार नितेश राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्वात जनअक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके हे देखील त्यामध्ये सहभागी झाले होते. श्रीरामपूर ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा घेण्यात आला. यावेळी आमदार राणे यांनी जोरदार घोषणाबाजी केली ते म्हणाले की, राज्यात कडवट हिंदुत्ववादी सरकार आहे. हे अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन काम करावं.
महाराष्ट्राचा अल्पसंख्यांक मंत्री नवाग मलिक नाही. अहमदनगरचा पालकमंत्री हसन मुश्रफ नाही. उद्धव ठाकरे देखील आता मुख्यमंत्री राहिले नाही याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. आणि काम करावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुहृदयसम्राट म्हणून काम करतात अशी त्यांची ख्वाती आहे असे ते यावेळी म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या हिंदू मुलांकडं वाकड्या नजरेने बघू नये, त्यांचे डोळे जाग्यावर राहणार नाहीत हे लक्षात ठेवावं. पोलीस प्रशासनात अनेकच चांगले अधिकारी आहेत. असे हिंदूंना न्याय देतात त्यांची बाजू घेतात सगळेच वाईट आहेत अशातला प्रकार नाही. पण जे वाईट आहेत त्यांच्यासाठी माझा हा इशारा समजा असं ते यावेळी म्हणाले…