तो चारित्र्याचा संशय घ्यायचा, आणि म्हणून त्याने तिच्यासोबत पाहा हे काय केल ? बातमीत सविस्तर.
पती-पत्नीचा जोडा हा देवा ब्राह्मणांनी बांधला असं म्हटलं जातं, पती-पत्नी सुखदुःखात एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या साथीने त्यांचा संसार फुलत असतो, मात्र कधीकधी याच पती-पत्नीमध्ये वादही होतात. आणि त्यामुळे कधी घटस्फोट, कधी संसार तुटणं ,कधी अनैतिक संबंध तर कधी सततचे वाद असे अनेक प्रकार घडतात.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील मुंबई गल्ली या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. पतीने चारित्र्याचा संशय घेऊन आपल्या 35 वर्ष धर्म पत्नीचा गळा आवळून खून केला. देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी असे आरोपीचे नाव आहे. या महिलेने आत्महत्या केली असं भासवण्यासाठी याने पुरावे नष्ट केले. आरोपीला रात्री उशिरा अटक केली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी यांचा विवाह देविदास चौधरी यांच्या सोबत झाला होता.
देविदास यांना दारूचा व्यसन होतं तो मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. मुलबाळ होत नसल्यामुळे तो सतत आपल्या पत्नी वरती संशय घ्यायचा, तिला मारहाण करायचा वारंवार माहेरहून पैसे आण असं म्हणत तिला शारीरिक, मानसिक तो छळ करत असे. दोन दिवसापूर्वी योगिता सुरत येथे मामाच्या घरी गेली असता व त्याने नातेवाईकांकडे तिची बदनामी केली, योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे आली, ती पुन्हा परतलीच नाही.
योगिताने गळफास घेऊन आत्महत्या केली असे सांगण्यात आलं, पोलिसांना सांगत असताना पती म्हणाला की, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बचत गट वाल्यांचे पैसे मागण्यासाठी तगदा लावत होते. अशी अफवा शहरात पसरवण्यात आली मात्र तिचा भाऊ दिनेश व इतर प्रत्यक्षदर्शीयांना योगिताच्या गळ्यावर ती सर्व बाजूंनी दोरीचे व्रण आढळून आले, गळ्यावर ओरबडल्याच्या खुणा होत्या. तिच्या नाकातून देखील रक्त येत होतं.
कुठेच दोरी लटकलेली नव्हती योगिताचे प्रेत खाली पडलेला होत, मात्र वरून पडल्याने कुठेही जखमा दिसत नव्हत्या यावरून हा सगळा प्रकार घातपाताचा असावा अस दिसत होतं, त्यामुळे योगिताचा खून झाल्याची खात्री तिच्या भावाला पटली आणि त्यानंतर आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.