मोठी बातमी : पोलीस निरक्षकास रंगेहात पकडले, पहा बातमी सविस्तर.
कुठे एखादा गैरव्यवहार होत असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनकडूनं वचक ठेवणं महत्त्वाचं असतं मात्र जर पोलीस प्रशासन लाचखोरपणा करत असेल तर नेमकं काय करायचं ? कारण एका व्यावसायिकाकडून एक लाख रूपयांची लाच स्विकारतांना पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक श्याम गोविंदराव गव्हाणे याला एसीबीच्या पथकाने एक लाख रूपयांची लाच स्विकारताना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी अहेरी पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आली.
ट्रान्सपोर्टिंग व्यवसायात अनेकदा भ्रष्टाचार होत असतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टची मागणी केली जाते तेव्हा हा भ्रष्टाचार देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होतो. आणि यामध्येच एका व्यवसायाकडे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्याच्याकडून पोलीस निरीक्षकानं एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदार हे नागेपल्ली येथील रहिवासी असून त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ट्रान्सपोर्टचे वाहन सुरळीत चालू देण्याकरिता श्याम गव्हाने याने तक्रारदाराकडून एक लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदारने याबाबतची तक्रार नागपूर एसीबीकडे केली.
त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. गव्हाने याने सांगीतल्यानुसार तक्रारदार यांनी लाचेची रक्कम पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनामध्ये ठेवली. काही वेळानंतर गव्हाने याने रक्कम आपल्या ताब्यात घेतली. अगोदरच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने गव्हाने याला रकमेसह पोलीस स्टेशनच्या आवारातच रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पोलीस निरिक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.