ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे निधन, बकिंगहॅम पॅलेसची घोषणा. पहा बातमी सविस्तर.
सर्वाना सर्वश्रुत असलेल्या अशा ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( दुसऱ्या ) निधन झाला आहे. त्यांच्या मृत्यू बाबतची अधिकृत घोषणा बकिंगहॅम पॅलेसने केली आहे. तब्बल 70 वर्ष राज्य केल्यानंतर ब्रिटन मधील सर्वात जास्त काळ महाराणी हे पद भूषवलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय वय वर्ष 96 मध्ये बालमोरल या ठिकाणी निधन झाला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राणी एलिझाबेथ त्यांच्या पूर्वी कौन्सिलची बैठक रद्द करण्यात आली त्यांना विश्रांती घेण्यात सांगितले गेले.
गुरुवारी महाराणी यांची प्रकृती खालावली अस वृत्त प्रसारित झालं होतं. तेव्हापासून डॉक्टर हे महाराणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवूनच होते. राणी काही दिवस स्कॉटलंड मधील बालमोरल वाड्यात होत्या उन्हाळ्यामध्ये त्या तेथे जात असायच्या. काही दिवसांपासून राणीच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं होत. शिवाय फेब्रुवारीमध्ये त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती.
त्यांना चालताना त्रास होत होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण त्या आजारामुळे खूप अशक्त झाल्या होत्या. राणी यांची जी ढासळणारी तब्येत गेल्या काही वर्षापासून चिंतेचा विषय बनली होती. त्यांनी त्यांचे बरेच कार्यक्रम हे रद्द देखील केले होते. त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचेही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले. आणि आता आज महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे निधन झाले आहे.