मोठी बातमी : इंदोरीकर महाराजांचं वादग्रस्त विधान; पहा या प्रसंगी धनंजय मुंडेनी काय केले, बातमीत सविस्तर.
पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेमध्ये आले आहेत. महाराष्ट्र राज्यातून देशात आणि परदेशातही आपल्या विनोदी शैलीतून कीर्तनाने समाजाला प्रबोधनाचे धडे शिकवणारे इंदुरीकर महाराज यांचा एक किस्सा आता चांगला चर्चेत आहे. त्यांनी एका कीर्तनामध्ये मोबाईल व त्याचप्रमाणे यूट्यूब चैनल वाल्यांना चांगलंच धारेवर धरलेलं आहे. माझ्या विधानांचा, माझ्या काही वाक्यांचा विपर्यास केला जातो स्वतःची प्रसिद्धीसाठी, टीआरपी साठी मला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात असं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.
बीड मधील परळी तालुक्यात त्यांचं कीर्तन चालू असताना इंदुरीकर महाराज उभे राहिले असताच त्यांना समोर कॅमेरा दिसतो. ते पाहताच इंदुरीकर महाराज म्हणतात कि,” बंद करा आणि खाली उतरा जिरवली तुम्ही आमची ते सगळं अगोदर खाली काढून घ्या.” असं म्हणत असतानाच त्यांना एक जणानी समजावण्याचा प्रयत्नही केला, मात्र तरी देखील त्यांचा संताप वाढत गेला. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर जर काही बातम्या प्रकाशित झाल्याच तर या सगळ्याची जबाबदारी आयोजकांनी घ्यावी असं इंदुरीकर चालू माईकवरच म्हणतात. आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पुढे महाराज असेही म्हणतात की, ” अहो एक तर 2 तास कीर्तन युट्युब ला दाखवतात, मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र हे युट्युब वाले पूर्ण कीर्तन कधीच टाकत नाही. काही इकडून काही दुसरीकडून त्याचा व्हिडिओ करून असे अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे फळ हे आम्हाला भोगावे लागतात आणि सध्याही आम्ही भोगतच आहोत. जर फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर एखादी क्लिप आली तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का ? असं त्यांनी आयोजकांना विचारलं.
याचवेळी अचानक धनंजय मुंडे म्हणाले, आठ दिवस कार्यक्रम थेट युट्युब वर प्रदर्शित केलाय मग इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम थेट दाखवला नाही तर त्याची काय परिस्थिती होईल याचा आमच्या सारख्याला विचार करावा लागतो त्यांना जो व्यवसाय करायचा आहे तो करू द्या ना तुम्ही आध्यात्मिक कार्य आहे हे सुरू ठेवा. असं धनंजय मुंडे यांनी अखेर माध्यमांच्या कॅमेरे लावणाऱ्यांना जे काम करायचे ते करतीलच पण आपण आपल्या अध्यात्माचे कार्य चालू आहे ते तसंच पुढे चालू ठेवूयात असं म्हणाले आणि कीर्तन पुढे चालू ठेवण्यासाठी विनंती देखील केली.