मोठी बातमी : ” हे दिग्गज नेते ” चक्कर येऊन जमिनीवर कोसळले, पहा कोण आहेत ते नेते.
ही राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येतेय आणि देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन कोसळले आहे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जोशी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची बातमी पुढे आली आहे.
अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आलेला आहे. पण चक्कर येऊन पडल्या मुळे त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल आहे यापूर्वी देखील त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचं खांद्याचे दुखणे हे वाढलेल आहे त्यांना वेगवेगळ्या व्याधी देखील आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालय येथे उपचार घेत होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची बातमी समोर आली होती मात्र या सर्व माहितीबद्दल जेलर प्रशासन यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. अनिल देशमुख यांच्या वरती अनेक गंभीर गुन्हे आहेत. मोठे मोठे डान्स बार रेस्टॉरंट या मालकांकडून 100 कोटी वसूल केले असा धक्कादायक आरोप परमवीर सिंग यांनी लावलेला आहे. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना त्यांनी पत्र देखील पाठवला होता.
सदर प्रकरणामुळे विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती कसून चौकशी झाली, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. मात्र याच जेलमध्ये ते कोसळले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे अशी माहिती समोर येतेय मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.