पहिलं बाळ गेलं म्हणून, दुसऱ्या बाळंतपणासाठी पत्नीला मुंबईत आणली, पण यावेळी….” पहा सविस्तर.
आदिवासी भागात रस्ते किंवा वाहने नसल्याने गर्भवतींना डोल्यांमधून किंवा खांद्यावरून नेल्याच्या घटना मागील काही दिवसांत मुंबईजवळच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांत घडल्या आहेत.
गर्भवतींना अगदी डोली करून खांद्यावर रुग्णालयात घेऊन जावं लागतं अशा घटना बऱ्याचदा घडल्यात मात्र मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. खड्ड्यामुळे एका गरीब महिलेची रिक्षा मध्ये डिलिव्हरी झाली. या महिलेच्या पतीने धावत पळत सांताक्रुज येथील देसाई रुग्णालय गाठला इथे आई आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दाखल केल आणि पुढील वैद्यकीय गुंतागुंती टळली.
रमेश यादव हे शास्त्रीनगर येथे राहतात काही दिवसापूर्वी त्यांच्या पहिल्या बाळाचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय सुविधा नसलेल्या गावी पत्नीचं बाळंतपण केल्यामुळे आपले मूल दगावलं होतं असं त्यांनी सांगितलं आणि ते दुःख त्यांच्या मनात होतं त्यामुळे दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी त्यांनी पत्नीला गावावरून मुंबईला आणलं. काही अडचण आली तरी त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत असा विचार त्यांनी केला. आणि त्यामुळे शास्त्रीनगर येथून अगदी दहा ते बारा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या रुग्णालय जवळ ते राहत होते मात्र रस्त्यात मोठमोठे खड्डे येतात वाहतूक कोंडी त्यामुळे तिथे पोहोचायला तीन पट जास्त वेळ लागायचा.
त्याच्या पत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या रस्त्यातील खड्डे चुकवत वाहतूक कोंडीतून मार्ग काढत यादव यांनी तिथून प्रवास केला मात्र रुग्णालयात पोहोचायच्या अगदी काही अंतरावर वाहतूक कोंडीमुळे 35 ते 40 मिनिटांचा वेळ जास्त लागला. त्यात आपली पत्नी प्रस्तुती कळामुळे हाल होत आहे त्यामुळे आणलेल्या पत्नीची रिक्षामध्येच डिलिव्हरी झाली. बाळ आणि आईला घेऊन ते रुग्णालयामध्ये गेले. तेव्हा डॉक्टरने त्वरित बाळाला अति दक्षता विभागामध्ये ठेवला.
बाळाला नीट श्वास घेता येत नव्हता आता मात्र बाळाची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरनी सांगितलं. वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी आईचा आणि बाळाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता मात्र सतर्कता दाखवत रुग्णालयात पोहोचवलं आणि त्यामुळे या बाळाला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा मिळाली. त्यामुळे आई आणि बाळ दोघेही ठणठणीत आहेत मात्र महानगरपालिकेच्या या धिसाळ कारभार यामुळे आणखी किती लोकांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळणार आहे हा प्रश्न आता उपस्थित राहतो.