” तो फक्त माझा आहे !” अस म्हणत दोन मुलींनी केली बस स्थानकावर हाणामारी, पहा त्या मुलाचे पुढे काय केले.
प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं असं म्हटलं जातं, मात्र प्रेमामुळे देखील युद्ध उभे राहतात. सैराट सारखा नावाजलेला चित्रपट हा प्रेमावरती आधारित होता आणि सैराटची पुनरावृत्ती बराच वेळा सुद्धा होऊन गेली. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कौटुंबिक प्रतिष्ठा यामुळे जो घातपात होतो तो दाखवलाय. मात्र प्रेमात कशा पद्धतीने युद्ध सुरू होतं हे देखील तुम्ही आता अनुभवू शकता. ही बातमी आहे पैठण बस स्थानकावरची या ठिकाणी दोन मुली एकमेकी वरती तुटून पडल्या. नेमकं घडलं काय होतं तर दोघींचाही बॉयफ्रेंड एकच होता. एका मुलीने आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुली सोबत फिरताना पाहिलं ती पैठण बस स्थानकात पोहोचली आणि या दोघींमध्ये खडा जंगी सुरू झाले नंतर काय मग राडाच राडा…,
बर या दोघींचे भांडण एवढ्या वरतीच निभवलं नाही तर या दोघींनी तुंबळ हाणामारी देखील केली. बस स्थानकातले प्रवासी हे सगळं काही पहात होते. तैनात असलेल्या पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात नेलं आणि चौकशी केली. चौकशी केली असता या हाणामारीचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला कारण या दोन्हीही मुली एकाच मुलावरती प्रेम करत होत्या. तो माझा प्रियकर असल्याचा दावा त्या दोघीही पोलिसांच्या समोर करत होता.
मात्र या दोन्हीही मुली अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. ते एका हायस्कूलमध्ये शिकत होत्या पण या दोन्ही मुलींवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी यांच्यावर कारवाई केली. या पुढील तपास देखील केला जातोय या बस स्थानकात जवळपास या दोन्हीही मुली अर्धा तास भांडण करत होत्या. या दोघींचे भांडण सुरू झालं की तो मुलगा मात्र तिथून पळून गेला.
एक शेर तर दुसरी सव्वाशेर त्यामुळे आमने सामने बस स्थानकावरती हा राडा झाला. तो फक्त माझाच आहे असं म्हणत या दोघीजणी एकमेकीवरती तुटून पडत होत्या. मात्र शाळकरी मुली एखाद्या सार्वजनिक ठिकाणी या गोष्टीवरनं हाणामारी करतात. यामुळे समाजात विपरीत संदेश देखील जाऊ शकतो. भर गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार घडणं हे योग्य नाही. या पद्धतीची चर्चा केली जाते.