नगरमध्ये मोठे रॅकेट कार्यरत; बनावट NOC प्रकरणात राजकीय नेत्यांवर टांगती तलवार. पहा बातमी सविस्तर.
राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले ; राजकीय नेत्यांवर टांगती तलवार.
बांधकाम परवानगीच्या ना हरकत दाखल्यासाठी नगरच्या आर्मी स्टेशन हेडक्वार्टरची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी सुमारे १२ ते १५ जणांची चौकशी कोतवाली पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागाकडे आजपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व दाखल्यांची माहिती कोतवाली पोलिसांनी मागविली आहे.
उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांसह लष्करी अधिकाऱ्यांकडूनही स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे. कोतवाली पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असून पोलिसांनी १२ ते १५ संशयतांची या प्रकरणात चौकशी केली आहे.
या प्रकरणाची व्याप्ती व साखळी मोठी असल्याने त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. बनावट दाखले देणारी ही साखळी कशी व कोठून सुरू झाली, याचाही शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, यासंदर्भात पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. देशाच्या संरक्षणाचा गंभीर विषय असल्याने त्या दृष्टीने बारकाईने तपास केला जात आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, काही जणांची चौकशी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बनावटी एनओसी प्रकरणांमध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यामध्ये अनेक राजकीय नेते, पदाधिकारी यांचा देखील समावेश असल्याची माहिती दबक्या आवाजात समोर येत आहे.