ब्रेकिंग : नगर दौंड रोडवर भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं, ग्रामस्थ आक्रमक, महामार्गावर राडा.

पुणे – नगर महामार्गावरती सातत्याने अपघातांचा सत्र सुरू होतं. यातच आता भर पडली आहे आणि नगर दौंड महामार्गावरती देखील अपघाताचे प्रमाण वाढलेला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, ही धडक इतकी भयानक होती की या ट्रकच्या धडकेमुळे दुचाकी ट्रक खाली आली, काही अंतरावरती फरफट नेलं.
अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुचाकीस्वारास तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सुनील साळवे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे ग्रामपंचायत संतप्त ग्रामस्थांनी बाबुर्डी बेंड परिसरात रस्ता रोको आंदोलन केल. यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने अपघात होत असल्याचा आरोप केला.
गेल्यावर्षीपासून गॅसची पाईपलाईन रोडच्या कडेला पडून आहे ती पाईपलाईन उद्यापर्यंत न हलवल्यास अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी दिला. अत्यंत भीषण असा अपघात घडला, नगर- दौंड महामार्गावर सुदैवानं या तरुणाचा जीव वाचला, मात्र तो गंभीर आहे. घटनेनंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूला पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोलिसांनी मध्यस्थ केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल.गेल्या महिन्याभरापासून महामार्गांवरती अनेक अपघात होत आहेत.